लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णानगर : शिकस्त दुमजली इमारतीचा काही भाग कोसळून एका महिलेचा दबून मृत्यू झाला. भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथे मंगळवारी दुपारी १.४५ च्या सुमारास ही घटना घडली. सावित्रीबाई बिहारीलाल केडिया (७१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आसेगाव पूर्णा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.पूर्णानगर येथील बिहारीलाल केडिया यांच्या मालकीची ती दुमजली इमारत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती इमारत १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. त्या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग अनेक वर्षांपासून शिकस्त होता. मंगळवारी दुपारी १.४५ च्या दरम्यान तो भाग पत्त्यासारखा कोसळला. सावित्रीबाई या इमारतीचा भाग कोसळत असताना मलब्याखाली अडकल्या. जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येऊन त्यांना लगेच आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.घटनेच्या वेळी बिहारीलाल केडिया, मुलगा मनोज, स्नुषा हे घराच्या दुसऱ्या भागात होते, तर सावित्रीबाई या जेवण केल्यानंतर गॅलरीत उभ्या होत्या. नेमका त्याचवेळी गॅलरीचा भाग कोसळला. पूर्णानगर येथील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच गजेंद्र गहरवार व सदस्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच आसेगाव पूर्णाचे ठाणेदार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत सदस्य उमेश महिंगे यांनी शिकस्त इमारतींसदर्भात ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला होता. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही.१२ मे रोजी दिले होते पत्रपूर्णानगर येथे अनेक इमारती १०० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. अनेक इमारती शिकस्त झाल्या. घरमालकांना नोटीस देऊन त्या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात व पावसाळयाच्या तोंडावर नागरिकांचा जीव धोक्यात आणू नये, असे विनंतीपत्र ग्रामपंचायत सदस्य उमेश महिंगे यांनी १२ मे रोजी सचिवांकडे दिले होते. त्या पत्राची दखल घेतली गेली नाही.पूर्णानगर येथील एका दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला. त्या मलब्याखाली दबून वृद्धेचा मृत्यू झाला. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.- प्रवीण वेरूळकर, सहायक पोलीस निरीक्षक, आसेगाव पूर्णा
दुमजली इमारत कोसळून वृद्धा दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM
पूर्णानगर येथील बिहारीलाल केडिया यांच्या मालकीची ती दुमजली इमारत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती इमारत १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. त्या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग अनेक वर्षांपासून शिकस्त होता. मंगळवारी दुपारी १.४५ च्या दरम्यान तो भाग पत्त्यासारखा कोसळला. सावित्रीबाई या इमारतीचा भाग कोसळत असताना मलब्याखाली अडकल्या.
ठळक मुद्देपूर्णानगर येथील घटना : ग्रामपंचायतकडून शिकस्त इमारतीची दखल नाही