अमरावती : श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे ऐटीत राहुन जिवन जगण्याच्या प्रयत्न करणारे बेरोजगार व काही विद्यार्थी आता वाम मार्गाला लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यातील काहींनी तर चक्क चोरीचा मार्ग अवलंबल्याचे चित्र समाजात पाहायला मिळत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरुवारी दुचाकी चोरणाऱ्या दोन विद्यार्थांना अटक केली. अब्दुल इम्रान अब्दुल सलीम (२२) व अश्विन गणेश वाघमारे (१९, दोन्ही रा. बिच्छु टेकडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. अब्दुल इम्रान हा भारतीय महाविद्यालयात बी. कॉम तृतीय वर्षाला व अश्विन वाघमारे हा विमलाबाई देशमुख महाविद्यालयात (रुलर) इयत्ता १२ वीत शिकतो.२४ मार्च रोजी चपराशी पुरा येथील इक्बाल अपार्टमेंटचे रहीवासी मो. दानीष मो. अफरोजोद्दीन (२४) यांच्या मालकीची एम. एच. ३० ए ११०२ क्रमांकाची यामा एस झेड दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरुन चोरुन नेली होती. याची तक्रार त्यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाची सुत्रे हलविली. अब्दुल इम्रान व अश्विन वाघमारे यांच्याकडे चोरीची दुचाकी असुन ते दुचाकीवर एम. एच. ३० ए. एस.६७४३ हा बनावट क्रमांक टाकुन सहरात फीरत असल्याची माहीती फ्रेजरपुरा पोलीसांना मीळताच पोलीस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश रोठोड, विनय गुप्ता, ओमप्रकाश देशमुख अमर बगेल, वरीश तायडे यांनी जुना बियाणी चौक येथे सापळा रचुन वरील दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडुन पोलीसांनी एम. एच. ३० ए. एस.६७४३ क्रमांकाची यामा एस झेड व एम. एच. ३१ ए. डब्लु ०१२५ या बनावट क्रमांकाच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी चोरट्यांकडून आतापर्यंत चोरी गेलेल्या दुचाकीबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या अन्य घटनाही उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
वाहन चोरीत दोन विद्यार्थ्यांना अटक
By admin | Published: June 26, 2014 11:02 PM