शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

ओमायक्रॉनचे दोन संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 5:00 AM

नागपूरचे रहिवासी असलेले हे कुटुंबीय शुक्रवारी युगांडा येथून नागपूर विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात माय-लेक ओमायक्रॉन संशयित आढळून आले. मात्र, तिघांनीही विमानतळावर क्वारंटाईन न होता २५ डिसेंबर रोजी एका राजकीय व्यक्तीच्या सल्ल्याने अमरावती गाठले. नागपूर येथील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस या तिघांचा शोध घेत त्यांनी दिलेल्या हनुमान मंदिर, डेली निडस्, नागपूर या पत्त्यावर पाेहोचले. ते तेथे नव्हतेच. मोबाईल क्रमांकासुद्धा बंद होता. अखेर पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आफ्रिका खंडातील युगांडा येथून नागपूर टाळून थेट अमरावतीला आलेल्या तीन जणांच्या कुटुंबातील दोघांची ओमायक्रॉनचे संशयित रुग्ण म्हणून नोंद घेण्यात आली. माय-लेकाच्या संपर्कात असल्याने निगेटिव्ह असलेल्या वडिलांनाही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे पुन्हा नमुने घेण्यात आल्याची माहिती आहे. नागपूरचे रहिवासी असलेले हे कुटुंबीय शुक्रवारी युगांडा येथून नागपूर विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात माय-लेक ओमायक्रॉन संशयित आढळून आले. मात्र, तिघांनीही विमानतळावर क्वारंटाईन न होता २५ डिसेंबर रोजी एका राजकीय व्यक्तीच्या सल्ल्याने अमरावती गाठले. नागपूर येथील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस या तिघांचा शोध घेत त्यांनी दिलेल्या हनुमान मंदिर, डेली निडस्, नागपूर या पत्त्यावर पाेहोचले. ते तेथे नव्हतेच. मोबाईल क्रमांकासुद्धा बंद होता. अखेर पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस केले. ते तिघेही अमरावती येथे दाखल झाल्याचे शनिवारी उशिरा रात्री स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. 

पोलीस, आरोग्य यंत्रणेने घेतला शोधनागपूर येथील विमानतळावर ओमायक्रॉन संशयितांनी क्वारंटाईन न होता एका राजकीय व्यक्तीच्या पाठबळावर अमरावती गाठले. त्यांना पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या चमूने शनिवारी उशिरा रात्री शोधून काढले. त्यानंतर सुपर स्पेशालिटीत उपचारासाठी दाखल केले. यात नागपूर येथील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस चमूने माेलाची भूमिका बजावली. 

युगांडातून आलेले माय-लेक नागपूर विमानतळावरील तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांचा अमरावतीत शोध घेतला व सुपर स्पेशालिटीत भरती केले. संपर्कातील तिसऱ्यावरही लक्ष आहे. - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

सुपर स्पेशालिटीत स्वतंत्र कक्षात उपचारयुगांडा येथून आलेल्या तिघांपैकी माय-लेक ओमायक्रॉनचे संशयित रुग्ण आहेत. वडील निगेटिव्ह आले आहेत. तथापि, त्यांच्या संपर्कात असल्याने त्यालाही सुपर स्पेशालिटीच्या स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. येथे डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.

नमुने पुन्हा पाठविले तपासणीसाठीयुगांडा व्हाया नागपूर ते अमरावती असा प्रवास करणाऱ्या कुटुंबातील तिघांचेही ओमायक्रॉन, कोरोनाची चाचणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नमुने घेतले. हे नमुने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आता या नमुन्यांच्या अहवालाकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या