अमरावती : कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार ४ ऑक्टोबरपासून अमरावती जिल्ह्यातील सुमारे
२ हजार शाळा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या शाळांतील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात (ऑफलाईन) भरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ज्ञानाची दारे उघडण्याचा
प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी होणार दिला असून, आता शाळांमध्ये विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेतील, असा निर्णय झाला आहे. मात्र, कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. सध्या ग्रामीण भागात काही शाळा सुरू आहेत. मात्र, विद्यार्थी उपस्थिती नगण्य आहे. शहरात दहावीचे वर्ग घेण्यात येत असले तरी पालकांच्या मनात भीती होती. परंतु आता शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतच्या
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळणार आहे. यात शहरात आठवी ते बारावी, तर पाचवी ते बारावीपर्यंत नियमांचे पालन करून शाळा सुरू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पाचवी ते बारावीपर्यंत ३ लाख ३७ हजार ७८९ विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिकच्या २८९४ शाळा असल्याची माहिती आहे.
--------------------
३, ३७, ७८९ विद्यार्थ्यांना दिलासा
पाचवी : ५४७२१
सहावी : ४४०५४
सातवी: ४४४२०
आठवी: ४४५१६
नववी: ४५८४४
दहावी: ४५४६८
अकरावी: ३४५८०
बारावी: ३४१९५
---------------
शहरी भागात हल्ली शाळा सुरू होण्याचे प्रमाण शून्य होते. मात्र, शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्या दिशेने तयारी केली जाईल. पालकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण
झाली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील शाळांमध्ये ८ ते १२ वर्ग सुरू होते.
- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी,