परतवाडा (अमरावती) : खेळताना शौचास गेलेल्या दोन चिमुकले सापन धरणाच्या कालव्यात बुडाले. सोमवारी सायंकाळी सहा वाजता दरम्यान ही घटना घडली. त्यातील एकाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले असून दुसऱ्याची शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे मुहिफाटा परिसरात शोककळा पसरली आहे.
अचलपूर तालुक्यातील मुहीफाटा आयुष गणेश बेटे (२ वर्ष) तर आरुष मिनेश बेटे वय दीड वर्ष अशी कालव्यात बुडालेल्या चिमुकल्यांची नावे आहे. वझ्झर ग्रामपंचायत ही अंतर्गत मुहीफाटा गावाचा समावेश असून मुख्य कालव्यातत सायंकाळी चार वाजता दोघेही चिमुकले खेळत होती. खेळताना ते शौचास गेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्यानंतर अचानक कालव्यात पडून ते बुडाले. सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांसह गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता कालव्यात एकाचा मृतदेह आढळून आला तर दुसऱ्याचा रात्री नऊ वाजेपर्यंत शोध लागला नव्हता. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून रात्र अंधारात टॉर्च वाहनांच्या लाईटने शोधमोहीम सुरू होती.
पंचक्रोशीत शोककळा
दोन्ही चिमुकले अचानक कालव्यात बुडाल्याने परिसरात वृत्त वाऱ्यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली. सर्वत्र शोककळा पसरली अनेक आदिवासी व बाजूच्या गावातील युवकांनी कालव्याचा शोधमोहीम सुरू आहे.
मूहिफाट येथील दोनच चिमुकले बालक चार वाजताच्या दरम्यान खेळण्यासाठी गेले असता कालव्यात बुडाले. एकाचा मृतदेह सापडला असून पोलिस यंत्रणा व गावकऱ्यांच्या सहकार्याने शोधमोहीम सुरू आहे.
- संदीप चव्हाण, ठाणेदार परतवाडा पोलिस स्टेशन