अमरावती - अंजनगाव सुर्जी शहरापासून 10 किलो मिटर अंतरावर सातपुडयाच्या पायथ्याशी खिरपाणी येथील धबधब्याच्या डोहात दोन युवक बुडाल्याची शुक्रवारी घडली. त्यांचा मृतदेह शनिवारी काढण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले. दोन्ही युवक कापूसतळणी येथील रहिवासी आहेत.
निसर्गाने या गावाला व आजूबाजू असलेल्या परिसराला एक अदभूत सौन्दर्य दिले ते पाहण्याची इच्छा सर्वांची होते. इथे असलेल्या धबधब्यात पोहण्याचा आनंद घेत असताना बाजूच्या डोहात कापुस्तळणी येथील आकाश साहेबराव तायडे वय 25 वर्ष.निलेश रामराव तायडे वय 26 वर्ष हे दोन तरुण बुडाले.
दरवर्षी येथे अंजनगाव सुर्जी शहरातील, तालुक्यातील व इतर गावातील नागरिक परिवारासह येतात. अंजनगाव सुर्जी वरून निघताना दहिगाव रेचा या गावा वरून जावे लागते आणि नंतर गरजधरी गाव व गावच्या बाजूला धरण आणि पुढे खिरपाणी गाव जेथे आदिवासी नागरिक राहतात. आणि यांच्या मधोमध कालिंका मातेचे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या थोडे वर गेल्यावर धबधबा आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दूरदुरून लोक येथे येतात. परंतु कोरोना महामारी मुळे सध्या परिस्थिती पाहता सर्व गर्दीचे ठिकाण शासन प्रशासनातर्फे नागरिकांच्या संरक्षणासाठी येथे कोणतीही सुरक्षा नसताना नागरिक सर्व नियम तोडून आपल्या परिवारा सहित या पर्यटन स्थळी येऊन स्वतःचे आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहे.
आणि आज खीरपाणी येथील धबधब्याच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.