इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन आठवड्यात ११,५८९ बाह्यरुग्ण तपासणी झाली. त्यात २७७ रुग्णांवर टायफाईडचे उपचार करण्यात आले. तसेच १६ जणांना सर्पदंश झाला. यातील काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब रुग्णांसह सामान्य नागरिक उपचाराकरिता येतात. मध्यप्रदेशातील काही गावांतील रुग्णांना अमरावती सोयीचे वाटत असल्याने तेही येथे उपचारार्थ घेतात. त्यामुळे दररोज शेकडो बाह्यरुग्णांची तपासणी येथे केली जाते. गरजेनुसार त्यांना वार्डात भरतीदेखील केले जाते. यामध्ये १ ते ७ एप्रिलपर्यंत ५ हजार ५९९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २८८ रुग्ण व्हायरल फिवरचे, ५५ टायफाईडचे, ७३ अतिसाराचे, ३ रुग्ण न्यूमोनियाचे, ८ सर्पदंशाचे व १९० रुग्ण श्वान चावल्याने उपचारार्थ भरती झाले होते. त्यांच्यावर योग्य औषधोपचार झाल्यानंतर सुटी देण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ ते १४ एप्रिल दरम्यान ५ हजार ९९० बाह्यरुग्णांचा प्रवेश झाला. त्यापैकी व्हायरल फिवरचे ४७३, टायफाईडचे २०४, क्रिटिकल २५ हायमस्ट, न्यूमोनियाचा १, सर्पदंशाचे ८ तर कुत्र चावल्याचे १२८ रुग्ण उपचारार्थ दाखल झाले होते. यापैकी काही रुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी दिल्याची माहिती अधिसेविका मंदा गाडवे यांनी दिली.क्षयरोगाची तपासणीइर्विन रुग्णालयात १ ते १४ एप्रिलपर्यंत ५७ रुग्णांची अस्वास्थामुळे क्षयरोगाबाबत तपासणी करण्यात आली. यापैकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे निदान तेथील डॉक्टरांनी केले. त्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.सध्या वातावरण बदलाचा परिणाम आरोग्यावर होत असल्याने व्हायरल फिवरचा जोर वाढला आहे. त्या अनुषंगाने उपचार आम्ही उपचार करीत आहोत.-श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय
१४ दिवसात टायफाईडचे २७७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 1:20 AM
जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन आठवड्यात ११,५८९ बाह्यरुग्ण तपासणी झाली. त्यात २७७ रुग्णांवर टायफाईडचे उपचार करण्यात आले. तसेच १६ जणांना सर्पदंश झाला. यातील काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ठळक मुद्दे१६ सर्पदंश। दोन आठवड्यांत ११५८९ रुग्णांची तपासणी