मोहीम : राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची चमू दाखलअमरावती : जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांची २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाची माहीती युडायस प्रणालीमार्फत संकलित केली आहे. त्या माहितीची वैधता तपासण्यासाठी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ही तपासणी मोहीम ४ ते १६ जानेवारीपर्यंत विविध जिल्ह्यात केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १ याप्रमाणे ३५ अधिकाऱ्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने केली आहे. संबंधित प्रत्येक अधिकाऱ्याला जिल्ह्याची तपासणी करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. युडायस बरोबर त्या शाळेची वस्तुस्थिती तपासण्याचे अधिकारही संबंधित अधिकाऱ्याला दिले आहेत. त्याचबरोबर युडायस प्रणालीच्या डेटा एन्ट्रीच्या सद्यस्थितीचा आढावाही घेण्यात येणार आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाने यु डायस प्रणालीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परीषदेने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदे च्या शाळांनी आॅनलाईन यु डायस प्रणालीवर भरलेलुी माहिती ही बिनचुक आहे. किंवा नाही याची पडताळणी या तपासणीत केली जात आहे. यु डायस प्रणालीत शिक्षण विभाग, जिल्हा परिषद शाळांनी भरलेल्या माहितीमध्ये प्रत्येक शाळांनी वर्ग खोल्या, विद्यार्थी संख्या, शिक्षक, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह अशा विविध सोई सुविधांची तपासणी युडायस तपासणी मोहिमेत केली जात आहे. यासाठी पाठक नामक महिला अधिकारी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या तपासणीनंतर ही सर्व माहिती शासनाकडे पाठविली जाईल. (प्रतिनिधी)
यु-डायस प्रणालीची तपासणी
By admin | Published: January 05, 2016 12:16 AM