नांदगांव पेठ : विना वर्क ऑर्डर वीस लक्ष रुपयांच्या फर्निचरच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच ताणून धरले. शिवाय गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात त्रिसदस्यीय समितीपुढे चौकशीदरम्यान सरपंचांनी सदर फर्निचर वाचनालयासाठी सुरू असल्याची स्पष्टोक्ती दिली. ज्या ठिकाणी फर्निचरचे काम सुरू आहे, तेथून बनविलेले साहित्य बाहेर येऊ शकत नाही. शिवाय जेथे वाचनालय बनविणार आहे तेथे सध्या ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. मग फर्निचर बनविण्यासाठी एवढी घाई का, असा प्रतिप्रश्न तक्रारदार व भाजप तालुकाध्यक्ष राजू चिरडे यांनी उपस्थित केल्याने पदाधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला आहे.
प्रशासनाने त्रिसदस्यीय समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली असू, परवा याबाबत बयाण नोंदविण्यात आले. यात ग्रामपंचायतने सदर फर्निचर हे वाचनालयासाठी करण्यात येत असल्याची स्पष्टोक्ती दिली. मात्र, प्रत्यक्षात ज्या खोलीत फर्निचरचे काम सुरू होते, तेथून हे साहित्य बाहेर काढणे कठीण आहे. ज्या ठिकाणी काम सुरू होते, त्या खोलीसाठी फर्निचर तयार करण्यात येत होते दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी वाचनालय बनविण्यात येणार आहे तेथे सध्या ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. सदर फर्निचर कोणत्या वाचनालयासाठी सुरू आहे, असा प्रतिप्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. याबाबत कोणता ठराव घेण्यात आला, त्याची प्रतसुद्धा देण्याती मागणी राजू चिरडे यांनी रेटून धरली.
===Photopath===
240621\img-20210605-wa0034.jpg
===Caption===
ग्रामपंचायत भवन मध्ये सुरू असलेले फर्निचर चे काम