हायकोर्टाच्या निर्णयानुसार प्रक्रिया : ८८ स्थळांचे स्थलांतरण अमरावती : उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शासनाने ३० आॅक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित, स्थलांतरित व निष्कासित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविला. जिल्ह्यात फेब्रुवारी २०१७ अखेर २ हजार ५५७ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी एक हजार ३९४ स्थळांचे नियमितीकरण, ८८ स्थळांचे स्थलांतरण तर ४ स्थळे निष्कासित करण्यात आलीत.कायदा, सुव्यवस्थेला धोका नसलेल्या धार्मिक स्थळांना नियमित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. तहसीलदार, बीडीओ, नगररचना विभाग, बांधकाम, पोलीस विभागाद्वारा अहवाल मागविण्यात आले. त्यानंतर एक हजार ३९४ धार्मिक स्थळांना निष्कासित करून उर्वरीत एक हजार ७५ स्थळांविषयीची प्रक्रिया सुरू आहे. कायद्यानुसार अडसर ठरणाऱ्या ८८ स्थळांना स्थलांतरित करून अमरावती तालुक्यातील चार धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात आली आहे.असा आहे कालबद्ध कृती कार्यक्रम२९ सप्टेंबर २००९ पूर्वी अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळांचे नियमितीकरण, स्थलांतरण व निष्कासनासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार धार्मिक स्थळांचे वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आली. त्यावर हरकती मागविल्या. त्याची सुनावणी झाली व १ मे १९६० पूर्वीची धार्मिक स्थळे निष्कासित करण्यासंदर्भातील यादी राज्य समितीला पाठविण्यात आली. नंतर निष्कासनाची तारीख सूचनास्थळावर लावून चार स्थळे निष्कासित करण्यात आलीत.तालुकानिहाय स्थितीअमरावती तालुक्यातील २६, नांदगाव खंडेश्वर २८१, चांदूररेल्वे, तिवसा ९, धामणगाव ८, अचलपूर २२२, चांदूरबाजार १३, दर्यापूर १७३, मोर्शी ५४७, वरूड १६, धारणी ६ व चिखलदरा तालुक्यातील ६ स्थळे नियमित केली आहेत. अमरावती तालुक्यातील २, भातकुली १५२, अंजनगाव ३ व चिखलदरा तालुक्यातील ८५ स्थळांची प्रक्रिया सुरू आहे. दर्यापूर तालुक्यातील ३ स्थळे निष्कासित केली असून येथील ६४ व मोर्शीतील १५ स्थळे स्थलांतरित करण्यात आली.जिल्ह्यातील २५५७ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी १३९४ स्थळे नियमित केली. उर्वरित १०७५ स्थळांची प्रक्रिया सुरू आहे. ८८ स्थळे स्थलांतरित व ४ निष्कासित करण्यात आली आहेत.- नरेंद्र फुलझेले,उपजिल्हाधिकारी (महसूल विभाग)
अनधिकृत १,३९४ धार्मिक स्थळे नियमित,४ निष्कासित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 12:10 AM