शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

बेशिस्त अतिक्रमणधारकांच्या आयुक्तांना वाकुल्या !

By admin | Published: April 06, 2016 12:07 AM

दिवसेंदिवस वाढत चाललेला बकालपणा, गिळंकृत करण्यात आलेले पदपथ आणि बेशिस्त अतिक्रमणाने शहराचा ‘चेहरा’ काळवंडत चालला आहे.

कारवाई संशयाच्या भोवऱ्यात : वाहतुकीचा खेळखंडोबाअमरावती : दिवसेंदिवस वाढत चाललेला बकालपणा, गिळंकृत करण्यात आलेले पदपथ आणि बेशिस्त अतिक्रमणाने शहराचा ‘चेहरा’ काळवंडत चालला आहे. यावर वारंवार उपायोजनांचा रतीबही घातला जातो; तथापि दोन-चार दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने अतिक्रमणाधारकांना फूस कुणाची, असा प्रश्न निर्माण होतो. शहरातील बेशिस्त अतिक्रमणधारक तर थेट आयुक्तांनाच वाकुल्या दाखवीत असल्याचा प्रकार आता वारंवार घडू लागला आहे. १४ एप्रिलला म्हणजे सुटीच्या दिवशी ‘चार्ज’ घेऊन आयुक्त गुडेवार यांनी महापालिका यंत्रणेला ‘रिचार्ज’ केले. सुरुवातीलाच त्यांनी अतिक्रमणधारकांविरोधात मोर्चा उघडला. अनेक सकारात्मक बाबी घडू लागल्या. निद्रिस्त अतिक्रमण विभागाला खडबडून जाग आली. वर्षभरापासून दर आठवड्यात शहरातील विविध भागात झालेले अतिक्रमण हटविले जाते. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे काम इथपर्यंत सुरळीत आणि सकारात्मक आहे. मात्र, त्यानंतर ते अतिक्रमण लगेच पुन्हा थाटले जात असल्याने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. भलामोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण निर्मुलन पथक अतिक्रमणावर गजराज फिरवते, साहित्य जप्त केले जाते, प्रसंगी फौजदारी कारवाई देखील केली जाते. या कारवाईला न जुमानता लगेच त्याच भागात पुन्हा हातगाड्या लागत असतील तर संशयाला पुरेसा वाव आहे. काही अतिक्रमणधारक तर महिन्याला ‘बिदागी’ देतो म्हणून हातगाडी लावण्याचे धाडस करतो, असे खुलेआम सांगतात. फौजदारी कारवाईनंतरही हातगाड्या पुन्हा लागत असतील तर ते महापालिका यंत्रणेला जुमानत नसावे किंवा त्यांच्यावर जबरदस्त ‘वरदहस्त’ असावा, अशा दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. ‘पारदर्शक आणि डॅशिंग’ अशी प्रतिमा असलेल्या गुडेवारांकडून अमरावतीकरांच्या भरपूर अपेक्षा आहेत. (प्रतिनिधी)या ठिकाणी होते वारंवार अतिक्रमणगांधी चौक, बापट चौक, शाम चौक, नगरवाचनालय, चित्रा चौक, इतवारा बाजार रोड, टांगापाडाव चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, बसस्थानक परिसर, रुख्मिणीनगर रोड, मजीप्रा संरक्षणभिंत, वाहतूक शाखा कार्यालय परिसर, पोलीस आयुक्तालय परिसर, आरटीओ परिसरात अतिक्रमण होते. मुजोर अतिक्रमणाचे प्रातिनिधिक उदाहरणमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संरक्षण भिंतीजवळ भजी व तत्सम खाद्यपदार्थ विकणाऱ्या दोघांवर गणेश कुत्तरमारे आणि टीमने वारंवार कारवाई केली. प्रसंगी फौजदारीही दाखल केली. अतिशय धोकादायक पद्धतीने व्हॅनमधून दोन भजीविक्रेते येथे दररोज अतिक्रमण करतात. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता हे भजीविक्रेते कुत्तरमारेंसह आयुक्तांनाही वाकुल्या दाखवीत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.