आॅनलाईन लोकमतधारणी : तालुका मुख्यालयापासून २७ किमी अंतरावर धारणी-परतवाडा मार्गावर मांगिया गावानजीक मेलाडोह पुलावरून कार नदीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. तुषार अशोक सोनखासकर (३२, रा. रतलाम) असे मृताचे नाव असून चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.प्राप्त माहितीनुसार, रतलाम येथील रहिवासी तुषार सोनखासकर हे त्यांच्या नातलगाकडे परतवाडा मार्गाने जात होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास मांगिया गावानजीक मेलाडोह पुलावर वाहन येताच चालकाचे नियंत्रण सुटले. पुलाला कठडे नसल्याने कार थेट नदीत कोसळली. यात कारमध्ये बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. रात्री या मार्गावरून वाहतूक कमी असल्याने व अंधार असल्याने ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.धारणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार बाहेर काढली व मृतांचे पार्थिव धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतापैकी केवळ एकाची ओळख पटली आहे. त्याच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली असून वृत्त लिहिस्तोवर कुणीही पोहोचले नसल्याची माहिती आहे.
कार नदीत कोसळली; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 6:16 PM
तालुका मुख्यालयापासून २७ किमी अंतरावर धारणी-परतवाडा मार्गावर मांगिया गावानजीक मेलाडोह पुलावरून कार नदीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
ठळक मुद्देमृत मध्यप्रदेशातीलधारणी-परतवाडा मार्गावरील घटना