पान ३
मोर्शी : हिवरखेड मार्गावरील ३३ केव्हीची उच्चदाब वहिनी अंडरग्राउंड करण्यात यावी, अशी मागणी पालिकेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनी केली आहे. तसे निवेदन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
शहरात प्रभाग क्र. ८ व वाॅर्ड क्र. १६ मधून ३० ते ३५ वर्षांपूर्वी मोर्शी ते हिवरखेड जाणारी ३३ केव्हीची विद्युत वाहिनी टाकण्यात आली. तेव्हा या परिसरात घरे नव्हती. मात्र, कालांतराने वसाहत तयार झाली. या विद्युत वाहिनीच्या आजूबाजूला व वाहिनीच्या खाली लोकांची घरे झाली असल्याने ही विद्युत लाईन मृत्यूला आमंत्रण देणारी ठरत आहे. नुकतेच या उच्च दाब विद्युत वाहिनीचे स्पार्किंग होऊन स्लॅबवर खेळणारी दोन शाळकरी मुले गंभीररीत्या भाजली होती. या गंभीर समस्येची दखल घेऊन परिसरातील नागरिकांनी ही उच्च दाब वाहिनी दुसरीकडे हलविण्यात यावी किंवा अंडरग्राउंड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राहुल जाधव, उमेश खुरपे, टिकाराम खुरपे, सूरज विश्वकर्मा, मनोज लांजेवार उपस्थित होते.