१० वर्षांपासून नेत्रदानाचे जनजागृती अभियान हरिना फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने १० जून रोजी एहसास करे नेत्रहीन का दर्द या अभियानांतर्गत खापर्डे बगिचा स्थित कार्यालयात सकाळी ९ वाजता समितीचे पूर्व अध्यक्ष जुगलकिशोर गट्टाणी, चंद्रकुमार जाजोदिया, नितीन धांडे, किरण पातुरकर, गिरधारीलाल बजाज, सुरेश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत डोळ्यावर काळी पट्टी बांधून दृष्टिहिनांची पिडा समजून, नेत्रदानाचे महत्त्व जाणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम मार्दर्शन करतील. एकाचवेळी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका कार्यालय, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत रवि राणा, आमदार सुलभा खोडके, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी सदर कार्यक्रम नियोजित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होऊ घातलेला आहे. तसेच ९ जून रोजी खापर्डे बगिचा येथे स्व. मंगलभाई पोपट नेत्रालय येथे सकाळी १० ते १ वाजतादरम्यान ब्रिजलाल अडवानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नोंदणीकृत ५१ मुलांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात बालरोगतज्ज्ञ प्रियंका भंसाली या करतील, अशी माहिती प्रा. मोनिका उमक यांनी दिली. यावेळी रामप्रसाद गिल्डा, अशोक जाजू, सारंग राऊत, मनोज राठी, चंद्रकांत पोपट आदी उपस्थित होते.
१० जूनला समजून घ्या अंधांच्या वेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:15 AM