लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : रात्रीच्या अंधारात घराची टेहळणी करणाऱ्या एका परप्रांतीय इसमाला चोर समजून रात्रभर दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले. मात्र पोलीस चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली. स्थानिक पुष्करणानगरात ही घटना घडली.शहरात एप्रिल महिन्यात चोरीच्या अनेक घटना उघड झाल्या. एका घरफोडी प्रकरणात अट्टल घरफोड्यास दत्तापूर पोलिसांनी वर्धा येथून अटक केली. मात्र शहरात भीतीचे वातावरण कायम होते. दरम्यान बुधवारी रात्री दोन वाजता पुष्करणानगर परिसरात एक ४५ वर्षीय इसम बंद घरांची टेहळणी करताना आढळला. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने जागे झालेल्या नागरिकांनी सदर इसमास पकडले. मात्र त्याला हिंदी, मराठी, इंग्रजी अशी कुठलीच भाषा येत नसल्याने व ज्या भाषेत तो बोलत होता ते कुणालाच कळले नाही. त्यामुळे सदर इसमाला चोर समजून मारहाण न करता दोरखंडाने बांधून ठेवले. सकाळी दत्तापूर पोलिसांच्या हवाली केले. सदर इसम ओरिसा राज्यातील सुदंरगड जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे नाव उदिर कलीम उल्लू असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्रीच्या दरम्यान एखाद्या प्रवासी रेल्वेगाडीतून हा इसम शहरात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. चौकीअंती त्याला सोडण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार रवींद्र्र सोनवणे करीत आहे.
चोर समजून त्याला रात्रभर ठेवले बांधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 1:29 AM
रात्रीच्या अंधारात घराची टेहळणी करणाऱ्या एका परप्रांतीय इसमाला चोर समजून रात्रभर दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले. मात्र पोलीस चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली. स्थानिक पुष्करणानगरात ही घटना घडली.
ठळक मुद्देपुष्करणानगरातील प्रकार : पोलिसांच्या ताब्यात दिले