प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रस्त्यावरील पारंपरिक पथदिवे बदलून महापालिकेने तब्बल ३६,६६० एलईडी बल्ब लावल्याने अंबानगरी धवल प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. एलईडी पथदिव्यांचा हा प्रयोग सर्वप्रथम (सन २०१६) अमरावतीत सुरु करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण राज्यातील प्रमुख रस्त्यांवर सुमारे २० लाख एलईडीवर बल्ब बसविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यासाठी नगरविकास विभागाने ईईएसएल (एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) सामंजस्य करार केला आहे. महापालिका क्षेत्रात सर्वत्र एलईडी लावल्याने महिन्याकाठीच्या वीजबिलात ३५ टक्यांची बचत झाली.शहरात पथदर्शी प्रकल्पदरवर्षी पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती व वीज बिलावर महापालिकेला कोट्यवधींचा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करणे तथा ऊर्जा बचतीच्या हेतूने सोडियम दिव्यांऐवजी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. अमरावती शहरात यापूर्वी २६ हजार पथदिवे लावण्यात आली होती. त्यात सातत्याने वाढ होत होती. पथदिव्यांमध्ये साधारणत: सोडियम व्हेपर लॅम्पचा आणि फ्लूरोसंट ट्यूबलाईटचा वापर केला जात होता. त्या पार्श्वभूमिवर नवीन विद्युत साहित्यामध्ये एलईडी वापराचा निर्णय तत्कालीन वेळी घेण्यात आला. त्याला नगरविकास विभागाने हिरवी झेंडी देत पायलट प्रोजेक्ट म्हणून एलईडी प्रकल्पासाठी अमरावती महापालिकेची निवड केली. ५ मार्च २०१६ रोजी त्यासाठी ईईसीएल कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीने जुने २२ हजार पथदिवे काढून नवीन ३६,६६० एलईडी बल्ब बसविले आहेत. ऊर्जाबचत करून वीज देयकावरील खर्च ५० टक्क्यांपर्यंत खाली आणणे, असा या योजनेमागील हेतू होता. करारानुसार, महापालिका क्षेत्रात ३३,३९७ एलईडी बल्ब लावायचे होते. मात्र, एप्रिल २०१८ अखेर संपूर्ण शहरात सध्याचे सोडियम व्हेपर व मर्क्युरी व्हेपर दिवे बदलून तेथे ३६,६६० दिवे लावण्यात आल्याची माहिती महापालिकेतील प्रकाश विभागाने दिली आहे.जबाबदारी ईईएसएलचीनगरविकास विभाग व महाराष्टÑ शासनामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार एलईडी दिव्यांचा पुरवठा करणे, बसविणे, सुरू करणे, तसेच दिवे बसविल्यानंतर देखभाल दुरुस्ती आणि वारंटी कालावधीत अदलाबदल यासह सेवा आणि देखभाल पुरविणे अशी संपूर्ण जबाबदारी ईईएसएलने स्वीकारली आहे. या दिव्यांची पुढील सात वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ईईएसएलकडे राहणार आहे.असे लागले एलईडी२० व ४० वॅटचे एलईडी वस्त्यांमधील रस्त्यांवर लावण्यात आले, तर ७२ व १२० वॅटचे एलईडी वस्त्यांमधील मोठे रस्ते व रस्ते दुभाजकांवर लावण्यात आले आहेत. याशिवाय ११० व १२० वॅटचे एलईडी हायमास्ट म्हणून चौकात लावण्यात आले आहेत. या दिवे लावणीमुळे ३० ते ३५ टक्के ऊर्जाबचत झाली आहे.वीज देयक ६५ लाखांवरसुमारे २६ हजार पथदिव्यांमार्फत होणाऱ्या वीजपुरवठ्यापोटी महापालिका महिन्याकाठी सुमारे ९० लाख ते १ कोटी रुपये वीजबिल भरायचे. एलईडी दिवे बसविल्यानंतर या खर्चात ३० ते ३५ टक्क्यांची बचत झाली असून, वीजदेयक ६५ ते ७० लाख रुपये महिन्याचे येऊ लागले आहेत.
३६ हजार एलईडीने झळाळली अंबानगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:57 PM
रस्त्यावरील पारंपरिक पथदिवे बदलून महापालिकेने तब्बल ३६,६६० एलईडी बल्ब लावल्याने अंबानगरी धवल प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. एलईडी पथदिव्यांचा हा प्रयोग सर्वप्रथम (सन २०१६) अमरावतीत सुरु करण्यात आला.
ठळक मुद्देमहिन्याकाठी ३५ लाखांची बचत : ईईसीएलचा अमरावती पॅटर्न यशस्वी