लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त २१ मे रोजी वलगाव येथे विदर्भस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री वसंत पुरके प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय आमदार यशोमती ठाकूर,जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी आमदार नरेंशचंद्र ठाकरे, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष किशोर बोरकर,अशोक ठाकूर, जि.प. सभापती जयंत देशमुख,किशोर चांगोले, राजाभाऊ निर्मळ, छाया दंडाळे, वीरेंद्र जाधव, किशोर चांगोले, आयोजन समितीचे प्रमुख तथा झेडपी सदस्य प्रकाश साबळे, निवड समितीच्या सदस्य पौर्णिमा सवाई, मिलिंद फाळके, जावेद खान, चिखले, वासुदेव जोशी, नितीन पवित्रकार व अन्य मान्यवरांची उपस्थित होते. यावेळी विदर्भातील प्रगतिशील एकूण १२ शेतकरी व प्रत्येकी एक कृषी वैज्ञानिक, कृषी पत्रकारिता, दोन उत्कृष्ट तिफनकरी, दोन अशा एकूण १६ जणांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त करणाऱ्यामध्ये अतुल लव्हाळे, रावसाहेब कराळे, गोविंदा जाधव, दिप्ती वानखडे, कल्याणी सोनोने, अभिजित जाधव, नरेंद्र सदावर्ते, वैभव तराळ, संदीप भांडे, अजय देशमुख, सतीश भटकर, शेख नाझिम शेख नबी, सचिन सारडा, तुळशीराम करूले यांचा समावेश आहे. प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी, तर कार्यक्रमाचे संचालन क्षीप्रा मानकर यांनी केले. याप्रसंगी आयोेजन समितीचे ऐनाउल्ला खान, पंकज देशमुख, शशीकांत बोंडे, राहुल तायडे, सुनील भगत, समीर जवंजाळ, अनिकेत ढेंगळे, अनिकेत जावरकर, नितीन कटकतलवारे, गोपाल महल्ले, उमेश वाकोडे आदींनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कृषीरत्न पुरस्कारासाठी अमरावतीसह अकोला व अन्य जिल्ह्यातील पुरस्कारास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची निवड समितीतर्फे करण्यात आली होती. कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शेतकरीपुत्रांचा अनोखा गौरव
By admin | Published: May 22, 2017 12:24 AM