अमरावती : जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान मुदत संपणाऱ्या २२९६ तसेच समर्पित आयोगाचे निर्देशानूसार आरक्षणाची निश्चिती झालेल्या ६३ अशा एकूण २३५९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक व विविध कारणांनी सरपंच व सदस्यांची पदे रिक्त असणाऱ्या २०६८ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाद्वारा मंगळवारी जाहीर करण्यात आलेला आहे.
निधन, अपात्र, राजीनामा यासह अन्य कारणांमुळे रिक्त असलेले २९५० ग्रामपंचायत सदस्य व व १३९ सरपंच यासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. आयोगाचे कार्यक्रमानूसार संबंधित तहसीलदार ६ ऑक्टोबरला नोटीस प्रसिद्ध करतील, १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्जाची प्रक्रिया, २३ ला उमेदवारी अर्जाची छाननी, २५ला उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ५ नोव्हेंबरला मतदान व ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.