लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ८ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहांतर्गत दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दायित्व स्वीकारले. याकरिता कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली.विद्यापीठाच्या मागासवर्गीय कर्मचारी संघटेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या सांघिक योगदानातून येथील भूमिपुत्र कॉलनीस्थीत बहुजन हिताय सोसायटीद्वारा संचालित सोलेरा येथील वसतिगृहातील मुलींच्या दोन मुलींच्या संपूर्ण वार्षिक शिक्षणाचा खर्चाचे दायित्वदेखील स्वीकारले. यावेळी विद्यापीठाच्या मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितीन कोेळी, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक जयंत वडते यांच्या हस्ते मागासवर्गीय कर्मचारी संघटेनेतर्फे ५२ हजार रूपयांचा धनादेश बहुजन हिताय सोसायटीला प्रदान करण्यात आला. तसेच सोसायटीमार्फत संचालित अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षा उपयुक्त १० हजार रूपये किंमतीचे गं्रथ प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटेनेचे कार्याध्यक्ष तथा अधिसभा सदस्य अजय देशमुख, सिनेट सदस्य रवींद्र सरोदे आदी उपस्थित होते. दरम्यान कुलगुरू चांदेकर, प्र-कुलगुरू जयपूरकर, कुलसचिव देशमुख यांनी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी बुंदीचे लाडू, मिठाई वाटपाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. मागासवर्गीय संघटनेतर्फे अभ्यासपूरक, वैचारीक व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ग्रंथाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.कुलसचिवांच्या स्वखर्चातून दोन विद्यार्थ्यांचे शिक्षणबहुजन सोेसायटीच्या वसतिगृहात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाचे दायीत्व कुलसचिव अजय देशमुख यांनी स्वीकारले आहे. यात एक मुलगा आणि एक मुलगी असणार असे त्यांनी जाहीर केले. स्वंयस्फूर्तीने दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवित कुलसचिव अजय देशमुख यांनी सामाजिक जाणीवेचा परिचय दिला.
विद्यापीठाने स्वीकारले सामाजिक दायित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:17 PM
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ८ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहांतर्गत दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दायित्व स्वीकारले. याकरिता कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली.
ठळक मुद्देकुलगुरू, कुलसचिवांचा पुढाकार : दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी