लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठ स्तरावर जमा होणारा आपत्ती व्यवस्थापन निधी कोरोना कोविड -१९ उपाययोजनांसाठी शासन तिजोरीत जमा करण्याची तयारी राज्य शासनाने चालविली आहे. महाविद्यालय स्तरावर प्रवेशाच्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याकडून १० रुपये आपत्ती व्यवस्थापन निधीकरिता घेतले जातात. त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात ३० लाखांचा निधी गोळा केला आहे.कोरोना विषाणूचा उद्रेक संपूर्ण देशात सुरू आहे. दरदिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी १४ एप्रिलपर्यंत होता, तो आता ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या काळात राज्यावर आर्थिक संकट हे भीषण रूप घेणार आहे. परिणामी शासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीत वाढ करण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. यासंदर्भाची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुलगुरूंसोबत संवाद साधताना दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गाविरूद्धच्या लढ्यात सर्वांचेच सहकार्य शासनाला अपेक्षित आहे. त्यानुसार पहिला टप्पा विद्यापीठांमध्ये जमा होणारा आपत्ती व्यवस्थापन निधी जमा करण्यावर शासन भर देत आहे. असे असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा सर्वंकष निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी जिल्हानिहाय केली जात आहे. राज्यभरातील विद्यापीठांना आपत्ती व्यवस्थापन निधी जमा करावा लागणार असल्याचे वास्तव आहे.आपत्ती व्यवस्थापन केंद्रात साहित्य खरेदीअमरावती विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन केंद्र अगोदचर सुरू झाले आहे. या केंद्रात आवश्यक वस्तू, साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. १५ लाखांचे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांची प्रशिक्षण, शिबिरे घेण्यात आली. विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांत चार लाख विद्यार्थी संख्या आहे.दरवर्षी सुमारे ३० लाख रूपये आपत्ती व्यवस्थापन निधीत गोळा होते. यंदा केंद्र स्थापन करण्यात आले असून, आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. असे असले तरी कुलगुरू, वित्त व लेखाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून अखर्चित निधी शासन तिजोरीत गोळा करण्यात येईल.- राजेश बुरंगे, सन्मवयक, राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती विद्यापीठ
विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापन निधी होणार शासनतिजोरीत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 5:00 AM
कोरोना विषाणूचा उद्रेक संपूर्ण देशात सुरू आहे. दरदिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी १४ एप्रिलपर्यंत होता, तो आता ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या काळात राज्यावर आर्थिक संकट हे भीषण रूप घेणार आहे. परिणामी शासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीत वाढ करण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे.
ठळक मुद्देशासनाकडून माहिती गोळा : प्रवेश शुल्कातून प्रतिविद्यार्थी दहा रुपये जमा