लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२१ अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १३ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे एमसीक्यू पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या बेमुदत संपामुळे स्थगित झालेल्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.विद्यापीठ अंतर्गत २३ अभियांत्रिकी, तर १८ फार्मसी महाविद्यालयांत परीक्षांचे केंद्र असतील. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे. १३ ते २७ जानेवारी दरम्यान अभियांत्रिकी, फार्मसी परीक्षांचे नियोजन केले आहे. हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. केंद्रावर ऑनलाईन व ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.यंदा महाविद्यालये सुरळीत झाले असताना ओमायक्रॉनचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्द्धतीने घेतल्या जाणार आहेत.दरम्यान, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज प्रभावित झाले आहे. यामुळे ३ जानेवारीपासून सुरू होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती.
अभियांत्रिकी परीक्षांचे नियोजन- बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग सेमिस्टर - ५ (सीबीसीएस) सकाळी १० ते ११- शाखा : सिव्हिल इंजिनीअरिंग (सीई), मेकॅनिकल इंजिनीअरिंग (एमई), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (ईई), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पावर) (ईपी), इलेक्ट्रिकल्स ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (ईएक्स), इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ईटीसी), कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (केएस), कम्प्यूटर इंजिनीअरिंग (केई), इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)
-बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग सेमिस्टर - ७ (सीबीसीएस) दुपारी १२ ते १- शाखा : सिव्हिल इंजिनीअरिंग (सीई), मॅकेनिकल इंजिनीअरिंग (एमई), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पाॅवर) (ईपी), इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (ईएक्स), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पावर) (ईएल), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (ईई), इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ईटी), कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (केएस), कम्प्यूटर इंजिनीअरिंग (केई), इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)
- बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग सेमिस्टर - ८ (सीजीएस)- शाखा : सिव्हिल इंजिनीअरिंग (सीई), मॅकेनिकल इंजिनीअरिंग (एमई), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पावर) (ईपी), इलेक्ट्रिकल्स ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (ईएक्स), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल अँड पावर) (ईएल), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (ईई), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ईटी), कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (केएस), कम्प्यूटर इंजिनीअरिंग (केई), इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)
हिवाळी २०२१ अभियांत्रिकी, फार्मसी, भेषजी शाखांच्या परीक्षा १३ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ
फार्मसी विषयनिहाय परीक्षांचे नियोजन- बी.फार्म. सेमिस्टर ५ (सीबीएसएस) - सकाळी १० ते ११ - बी.फार्म. सेमिस्टर ७ (सीबीएसएस) - दुपारी१२ ते १- बी.फार्म. सेमिस्टर ८ (सीबीएसएस) - दुपारी २ ते ३- डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म डी.) पार्ट ५ - दुपारी १२ ते १