लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठातील विविध इमारतींवर सौर उर्जेतूृन ८.५० लक्ष युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.भारत सरकारच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड या संस्थेद्वारे ‘स्वच्छ भारत स्वच्छ ऊर्जा’ प्रकल्पांतर्गत देशातील शासकीय इमारतींवर ‘रुफटॉप सोलर प्लँट’ च्या माध्यमातून नैसर्गिक वीज निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मुंबई येथील मे.क्लीन मॅक्स एनव्हायरो एनर्जी सोलुशन्स प्रा.लि., कंपनीशी अमरावती विद्यापीठाने करार केला आहे. यावेळी प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक जे.डी. वडते, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य एस.के. ओमनवार, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, उपअभियंता राजेश एडले आदी उपस्थित होते.अशी तयार होणार विभागनिहाय वीजभौतिकशास्त्र विभाग- ११५.२०, ग्रंथालय- १८५.६०, जीवतंत्रशास्त्र- ६४.००, वनस्पतीशास्त्र-५१.२, शिक्षण विभाग-३२.००, रसायनशास्त्र- ३२.००, मूल्यांकन भवन-९६.०० या इमारतींच्या छतावर मे. क्लीन मॅक्स एनव्हायरो एनर्जी सोल्युशन्स प्रा.लि., या एजन्सीमार्फत सौर ऊर्जेसाठी सयंत्रे स्थापित होणार आहेत. हा प्रकल्प वर्षभरात कार्यान्वित होईल, अशी माहिती सौर ऊर्जा कंपनीचे अधिकारी राहुल शेळके यांनी दिली.
विद्यापीठात सौर ऊर्जेतून ८.५० लक्ष युनिट विजेची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:37 PM
संत गाडगेबाबा विद्यापीठातील विविध इमारतींवर सौर उर्जेतूृन ८.५० लक्ष युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.
ठळक मुद्देकुलगुरुंच्या हस्ते उद्घाटन : अमरावतीत सर्वात मोठा प्रकल्प