लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ जबाबदारी असलेल्या बंगळूरू येथील माइंड लॉजिक एजन्सीकडून परीक्षांचे काम कमी करून त्यांचे पंख छाटण्यास प्रारंभ झाला आहे. सिनेट सभेतील निर्णयानुसार विद्यापीठ प्रशासनाने हिवाळी परीक्षांच्या आॅनलाईन निकालाची धुरा आता लर्निंग स्पायरल या कंपनीकडे सोपविली आहे.उशिरा आणि सदोष निकाल लावून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या माईंड लॉजिक्स कंपनीकडून उन्हाळी २०१७ परीक्षेपासून परीक्षापूर्व आणि परीक्षोत्तर कामे काढून घेण्याचा निर्णय कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सिनेट सभेत जाहीर केला. परंतु, त्यापलीकडे आता हिवाळी परीक्षेपासूनच माईंड लॉजिक्सकडून परीक्षोत्तर कामे काढून घेण्याचा सपाटा परीक्षा संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी लावला आहे. त्यामुळे आता अभियांत्रिकी, विधी व फार्मसी या तीनही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल लावण्याची जबाबदारी लर्निंग स्पायरल या कंपनीकडे देण्यात आली.माईंड लॉजिक्सने २०१७ साली उन्हाळी परीक्षेच्या वेळीच प्री आणि पोस्ट परीक्षेची कामे करण्यास सक्षम नसल्याचे पत्र तत्कालीन परीक्षा संचालक जयंत वडते यांच्याकडे दिले होते. मात्र, प्रशासनानेच त्यावेळी माईंड लॉजिक्सला ती कामे करण्याची विनंती केल्याने कंपनीने पुन्हा विद्यापीठात हैदोस घातला होता. कुलगुरूंनी उन्हाळी-२०१९ पासून कंपनीकडून ही कामे काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण कंपनीने यापूर्वीच ही कामे करण्यास आपण सक्षम नसल्याचे म्हटलेले आहे.मार्इंड लॉजिक्सने घेतली माघारमाईंड लॉजिक्सला समर्थन करणारे अधिकारी आता विद्यापीठात नसल्याने कंपनीला परीक्षा विभागाशी समन्वय साधून काम करणे जड जात आहे. कंपनीविरुद्ध प्रचंड असंतोष वाढल्याने कंपनीने आपले दुकान गुंडाळण्याची तयारी चालवली आहे. डॉ. हेमंत देशमुख यांनी कंपनीला ताकिद दिल्यानंतर माईंड लॉजिक्सने परीक्षोत्तर कामे करण्यास नकार देणारे पत्र नुकतेच परीक्षा संचालकांना दिले आहे. त्यामुळे ही कामे काढून लर्निंग स्पायरल या नवीन एजंसीकडे देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
विद्यापीठाने ‘मार्इंड लॉजिक’चे पंख छाटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:13 PM
अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ जबाबदारी असलेल्या बंगळूरू येथील माइंड लॉजिक एजन्सीकडून परीक्षांचे काम कमी करून त्यांचे पंख छाटण्यास प्रारंभ झाला आहे. सिनेट सभेतील निर्णयानुसार विद्यापीठ प्रशासनाने हिवाळी परीक्षांच्या आॅनलाईन निकालाची धुरा आता लर्निंग स्पायरल या कंपनीकडे सोपविली आहे.
ठळक मुद्देसिनेट सभेत निर्णय : परीक्षेच्या निकालाची धुरा ‘लर्निंग स्पायरल’कडे