अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२० प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २० एप्रिल यादरम्यान होणार आहे. त्याअनुषंगाने कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली असून, महाविद्यालयांना पत्राद्धारे कळविण्यात आले आहे.
अभियांत्रिकी व तांत्रिकी परीक्षा वगळता अन्य परीक्षांचे प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २० एप्रिल दरम्यान महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. नियमित व माजी विद्यार्थ्यांसाठी ही नियमावली लागू असणार आहे. विषय शिक्षकांनी विद्यार्थांना एकूण प्रात्यक्षिकांच्या ५० टक्के ऑनलाईन डेमॉस्ट्रेशनद्धारे प्रात्यक्षिक करावे लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना २५ पैकी २० गुण सोडवायचे असून, त्यानंतर विषय प्राध्यापकांना विद्यापीठात गुण पाठवावे लागणार आहे. प्रात्यक्षिक गुणांचे रेकॉर्ड महाविद्यालयांना ठेवावे लागणार आहे. प्रत्येक एमसीक्यू गुणांना दोन गुण द्यावे लागणार आहे. एकाद्या विषयाला ५० गुणांचे प्रात्यक्षिक असल्यास त्या विद्यार्थ्याना ५० पैकी २५ गुण प्राप्त होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.