शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

विद्यापीठात प्राध्यापक पदोन्नतीत ‘फिक्सिंग’, सिनेट सभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 1:43 PM

सहायक प्राध्यापकांना प्राध्यापकाचा दर्जा देणाऱ्या समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फिक्सिंग’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देआता सॉफ्टवेअरची मदत घेणार

अमरावती : सहायक प्राध्यापकांनाप्राध्यापकाचा दर्जा देणाऱ्या समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फिक्सिंग’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुटाचे अध्यक्ष सिनेट सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी याबाबत गौफ्यस्फोट केला. पुराव्यासह त्यांनी माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यकाळातील समितीमधील हा घोळ पुढे आणला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा घेण्यात आली नव्हती; परंतु कोरोनाची लाट ओसरल्यानंतर गुरुवारी सिनेटची सभा घेण्यात आली. या सभेत अनेक विषय चर्चेस आलेत; परंतु दुपारच्या सत्रात डॉ. अर्चना बोबडे यांनी मांडलेल्या प्रश्नावरून मात्र वादग्रस्त प्रकार पुढे आला. महाविद्यालयांकडून प्राध्यापक या पदाकरिता पदोन्नतीला मान्यता देणाऱ्या समितीमध्ये सहयोगी प्राध्यापक असल्याचे डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सभागृहात सांगितले.

प्राध्यापकपदासाठी मान्यता देण्यासाठी ४४ प्रस्ताव विद्यापीठाला पाठविण्यात आले होते. त्यापैकी १८ समित्यांमध्ये दोन सदस्य सहयोगी प्राध्यापक होते. प्रा. पी.आर. राजपूत सहयोगी प्राध्यापक असताना त्यांना समितीमध्ये का काढण्यात आले, असा प्रश्न प्रवीण रघुवंशी यांनी उपस्थित केला. याशिवाय प्रशांत निचनकर व यू.ई. चौधरी या दोघांना १८ समित्यांमध्ये तिसऱ्या व चौथ्या क्रमाकांचे सदस्य म्हणून नेमण्यात आले. दोन सदस्यांची वारंवार नेमणूक का करण्यात आली? असा प्रश्नही त्यांनी केला.

प्र-कुलगुरूंना मान्यता देण्याचा नियम कुठे?

प्रकुलगुरूंनी प्राध्यापकासाठी मान्यता द्यावी हा नियम कुठे आहे, असा प्रश्न करीत असल्यास तो दाखविण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. अमरावतीसह अकोला, बुलडाणा येथील महाविद्यालयांतील सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक म्हणून पदोन्नती देण्यासाठी गठित समित्यांमध्ये हा प्रकार घडला. त्यामुळे सदर गंभीर प्रकाराबाबत त्यांनी विद्यापीठाला जाब विचारला. चर्चेत प्रा.डॉ. मीनल ठाकरे, सिनेट सदस्य डॉ. बी.आर. वाघमारेदेखील सहभागी झाले.

समितीचे कार्य बेजाबदारपणे

प्राध्यापक पदोन्नती समितीमध्ये काही महाविद्यालयांत समिती येण्यापूर्वी त्याच महाविद्यालयाच्या प्राध्यापकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे समितीचे कार्य किती बेजबाबदारपणे झाले याची प्रचीती येत असल्याचे प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले.

सॉफ्टवेअरद्वारे होणार निवड

पदोन्नती समितीमध्ये यापुढे घोळ होऊ नये यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी सांगितले. यासाठी संगणक विभागाचे डॉ. ठाकरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Educationशिक्षणProfessorप्राध्यापकuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रfraudधोकेबाजी