लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने चालू वर्षांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यासाठी मंगळवार, ४ जून रोजी सिनेट सभा बोलावली आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने एकरुप परिनियमांचा आधार घेत महत्त्वाच्या प्रश्नांना बगल दिल्याचा आरोप नुटा सदस्यांनी केला आहे. शैक्षणिक बाबीसंदर्भाचे विषय सिनेटमध्ये नव्हे तर जिल्हा परिषदेत मांडावे काय, असा सवाल विवेक देशमुख, प्रवीण रघुवंशी यांनी केला.नवी सिनेट सभा महाराष्ट्र सार्वजनिक कायदा २०१६ नुसार घेण्यात येत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, यापूर्वी पार पडलेल्या सिनेट सभेत सदस्यांचे नाकारलेले प्रश्न हे विषय पत्रिकेवर प्रसिद्ध केले जात होते. मात्र, नुटाचे विवेक देशमुख, प्रवीण रघुवंशी यांनी सिनेट सभेत विचारलेले प्रश्न फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे देशमुख, रघुवंशी यांनी नेमके कोणते प्रश्न विचारले? याबाबत उत्सुकता आहे. विद्यापीठ प्रशासन अडचणीत येणार असल्याने त्यांच्या प्रश्नांना सिनेटच्या अजेंडावर स्थान देण्यात आले नाही. यापूर्वी स्वीकृत किंवा अस्वीकृत असे प्रश्नांसमोर नोंद असायची. त्यामुळे कोणत्या सदस्यांचे कोणते प्रश्न विचारले, हे नेमके कळत होते. परंतु, आता एकरुप परिनियमांचा आधार घेत महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देत असल्याचे वास्तव पुढे आले. ज्या सिनेट सदस्यांचे प्रश्न नाकारले त्यांना एकरूप परिनियम क्रमांक ४/२०१९ मधील परिच्छेद ६ च्या तरतूद क्रमांक (११) अन्वये प्राप्त प्रश्नांची स्वीकार्यता ठरविण्याबाबत कुलगुरुंना प्राप्त अधिकारांतर्गत सदर्हू तरतुदीतील (त्र) कलमान्वये मोडत असल्यामुळे अग्राह्य ठरविला. ४ जून रोजी अधिसभा सभेत या प्रश्नावर कोणतीही चर्चा करण्यास परवानगी असणार नाही, असे पत्र कुलसचिव तुषार देशमुख यांनी २७ जून रोजी सदस्यांना पाठविले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात सिनेट सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना यापुढे स्थान असणार नाही, ही बाब आता स्पष्ट झाली.पेपरफुटी प्रकरण सिनेटमध्ये गाजणारअभियांत्रिकी मॅकेनिक्स विषयाचे पेपर फुटल्याचे प्रकरण मंगळवारी होऊ घातलेल्या सिनेट सभेत गाजणार असल्याचे संकेत आहेत. एकीकडे परिनियमांचा आधार घेत काही सिनेट सदस्यांचे प्रश्न डावलले आहे. त्यामुळे शैक्षणिक बाबीविषयी प्रश्नांना सिनेटमध्ये स्थान न मिळाल्याने पेपरफुटीप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न सिनेट सदस्यांकडून केला जाणार आहे.
विद्यापीठाने अडचणींचे प्रश्न नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:13 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने चालू वर्षांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यासाठी मंगळवार, ४ जून रोजी सिनेट सभा बोलावली आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने एकरुप परिनियमांचा आधार घेत महत्त्वाच्या प्रश्नांना बगल दिल्याचा आरोप नुटा सदस्यांनी केला आहे. शैक्षणिक बाबीसंदर्भाचे विषय सिनेटमध्ये नव्हे तर जिल्हा परिषदेत मांडावे काय, असा सवाल विवेक देशमुख, प्रवीण रघुवंशी यांनी केला.
ठळक मुद्देनुटा सदस्यांचे प्रश्न गायब : विद्यापीठाकडून मुस्कटदाबीचा आरोप