लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाने गुंतवणूक धोरणात बदल करण्याचा प्रस्ताव अवलंबविला आहे. त्यानुसार बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या ठेवीपैकी ८० कोटींची ठेव जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेत ठेवण्याचा प्रस्ताव गुंतवणूक समितीने तयार केला आहे. तूर्तास या प्रस्तावास कुलगुरूंनी मान्यता दिल्याची माहिती आहे. फायनान्स समिती आणि व्यवस्थापन परिषद सभेने एकदा मान्यता दिल्यास ८० कोटींची ठेव बदलविली जाणार आहे.अमरावती विद्यापीठाने यापूर्वी विविध फं डातून जमा होणारी रक्कम ही ठेवस्वरूपात बॅक आॅफ महाराष्ट्रसोबत करार केला होता. त्यानुसार आतापर्यत विविध स्वरूपाची ठेव ही बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये जमा केली जाते. मात्र, बॅक आॅफ महाराष्ट्र विद्यापीठ शाखेतून मात्र व्याज दर अन्य बॅकांपेक्षा कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या गुंतवणूक समितीने ठेव रक्कम अधिक व्याज दर असलेल्या बॅके ठेवी मुदतीकरिता ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनीदेखील या प्रस्तावास होकार दर्शविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता वित्त व लेखा समिती आणि व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर सुमारे ८० कोटींची ठेव अन्य बँकेत वळती केली जाणार आहे.बँक आॅफ महाराष्ट्र व्यतिरिक्त अन्य बँकेत ६.७५ ते ७.७५ दरापर्यंत व्याजदर मिळते. बँक आॅफ महाराष्ट्र मात्र ६.५० ते ७ टक्क््यांपर्यंत व्याजदर देत असल्याची माहिती आहे. कमी व्याजदरामुळे ठेवी बदलविण्याचा निर्णय घेतला आहे.व्याजदर रकमेतून विद्यार्थी हिताचे उपक्रममोठी रक्कम बँकेत ठेव करून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून विद्यार्थिहिताचे उपक्रम राबविले जाणार आहेत. यात गरीब, सामान्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक मदत तसेच विद्यापीठ कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचाराकरिता सहकार्य असे विविध उपक्रम राबविले जातील, अशी माहिती वित्त व लेखा अधिकारी भारत कºहाड यांनी दिली.
विद्यापीठ ८० कोटींची ठेवी बदलविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 1:12 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गुंतवणूक धोरणात बदल करण्याचा प्रस्ताव अवलंबविला आहे. त्यानुसार बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या ठेवीपैकी ८० कोटींची ठेव जास्त व्याजदर देणाºया बँकेत ठेवण्याचा प्रस्ताव गुंतवणूक समितीने तयार केला आहे.
ठळक मुद्देगुंतवणूक समितीचा प्रस्ताव : वाढीव व्याजदर देणाऱ्या बँकेला प्राधान्य