अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी- २०२० ऑनलाईन परीक्षांचे २० मे पासून तर ४ जून या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे. एकूण १९८ परीक्षा घेण्यात येत असून, महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ९ ते १५ मे दरम्यान कठोर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, विद्यापीठाच्या केंद्रीय प्रवेश समितीने घेतलेल्या परीक्षांचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे. आता या परीक्षा २० मे पासून घेण्यात येणार आहेत. एमसीक्यू प्रश्नावली आणि ऑनलाईन प्रणालीने परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षांच्या एक दिवस अगोदर प्रश्नपत्रिका महाविद्यालयात पाठविण्यात येणार आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.
---------------
या शाखांच्या होणार ऑनलाईन परीक्षा
इंजिनीअरिंगच्या सर्व कॉमन शाखा, केमिकल टेक्नॉलॉजी (फूड, पल्प ॲन्ड पेपर, ऑईल ॲन्ड पेंट, पेट्रोकेमिकल टेक्नाॅलॉजी, बॅचलर ऑफ आर्टिकल, सिव्हील इंजिनीअरिंग (कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेंट), सिव्हील इंजिनिअरिंग (जिओटेक्नीकल इंजिनीअरिंग), सिव्हील इंजिनीअरिंग (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग), सिव्हील इंजिनीअरिंग (ट्रॉन्सपोर्टेशन ॲन्ड मॅंनेजमेंट), काम्प्युटर इंजिनीअरिंग, काम्प्युटर सा यन्स ॲंन्ड इंजिनीअरिंग, काम्प्युटर सायन्स ॲंन्ड ईम्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), डिजिटल ईलेक्ट्रॉनिक्स, ईलेक्ट्रिक इंजिनीअरिंग(ईलेक्ट्रिक ॲन्ट पॉवर), ईलेक्ट्रिक ॲन्ड ईलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, ईलेक्ट्रिक ईंजिनिअरींग (ईलेक्ट्रिक पॉवर सिस्टिम), ईलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, ईन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनीअरिंग (ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरींग ॲन्ड मेकॅनिकल सिस्टिम), मेकॅनिकल इंजिनीअरिंग (कॅड, कॅम), मेकॅनिकल इंजिनीअरिंग (थर्मल इंजिनीअरिंग), पर्यावरण अभियांत्रिकी, कम्प्युटर सायन्स ॲंन्ड इंजिनीअरिंग, डिजिटल ईलेक्ट्रॉनिक्स, एन्व्हॉयर्न्मेंटल ईंजिनिअरींग,, माहिती तंत्रज्ञान, प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट, केमिकल ईंजिनिअरींग, मेर्बेन ॲन्ड सेर्पेशन टेक्नॉलॉजी, एम.एस्सी (अप्लाईड ईलेक्ट्रॉनिक्स सत्र -१, सत्र -३ सीजीएस, पी.जी. डिप्लोमा ईन कॉम्प्युटर सायन्स सत्र १, प्रथम वर्ष मास्टर ईन कॉम्प्युटर सायन्स सत्र -१, द्धितीय वर्ष मास्टर ईन कॉम्प्युटर सायन्स सत्र- १, तिसरे वर्ष मास्टर ईन कॉम्प्युटर सायन्स सत्र- १, पी.जी. डिप्लोमा ईन कॉम्प्युटर सायन्स सत्र १ (नवीन), प्रथम वर्ष मास्टर ईन कॉम्प्युटर सायन्स सत्र -१ (नवीन), द्धितीय वर्ष मास्टर ईन कॉम्प्युटर सायन्स सत्र- १(नवीन), मास्टर ईन कॉम्प्युटर (दोन वर्ष पदवी कोर्स) सत्र -१ या शाखांचा समावेश आहे.