अमरावती.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, कोविड - १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्हाधिकारी, अमरावती यांनी ७ मे, २०२१ च्या पत्रानुसार अमरावती जिल्ह्राकरीता ९ मेचे दुपारी १२.०० वाजतापासून १५ मेचे रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी व प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत.
सदर आदेशाच्या अनुषंगाने विद्यापीठाद्वारे जाहीर वेळापत्रकानुसार दि. १२ मे, २०२१ पासून सुरु होणाया हिवाळी २०२० च्या परीक्षा (अभियांत्रिकी व तांंत्रिकी, विधी, फार्मसी या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वगळून) तूर्त स्थगीत करण्यात येत असून सदर परीक्षांची पुढील तारीख लवकरच विद्यापीठाच्यावतीने जाहीर करण्यात येईल. याबाबत विद्यापीठाने ८ मे रोजी परिपत्रक काढले असून ते सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठविले आहे. तरी याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे.