(असाइनमेंट/ फोटो- मनीष)
अमरावती : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्यानंतर संसर्ग माघारला होता. त्यामुळे कुलूपबंद करण्यात आलेले जिल्ह्यातील १३ कोरोना सेंटर आता फेब्रुवारी महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या दोन दिवसांत उघडण्यात आले आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या २२ दिवसांत तब्बल ८,२१८ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या चार हजारांपर्यंत पोहोचली आहे. होम आयसोलेशन वगळता सद्यस्थितीत ९९७ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचारार्थ दाखल आहेत. संक्रमितांचा सतत दोन दिवसांचा ७०० हून अधिक आकडा पाहता, शहरातील शासकीय कोरोना हॉस्पिटलमधील बेडची संख्या कमी पडू लागल्याने आता प्रत्येक तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आरोग्य यंत्रणेला दिले होते. त्यानुसार आता जिल्ह्यात सद्यस्थितीत १३ केंद्रे सुरू करण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय व खासगी असे एकूण २३ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सध्या ९८६ रुग्ण ॲडमिट आहेत, तर ६८४ बेड रिक्त असल्याचा जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. याद्वारे अधिकाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद होऊन पुढे कोरोनाची साखळी खंडित करण्यास मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
अचलपूर तालुका धोक्याच्या वळणावर
जिल्ह्यात आतापर्यंत ३०,१९७ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामध्ये अमरावती महापािलका क्षेत्रात २० हजारांवर रुग्णांची नोंद झाली. याशिवाय अचलपूर तालुका कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ झाला आहे. या तालुक्यात आतापर्यंत १,४०० रुग्णांची नोंद झाली. सद्यस्थितीत ३०१ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर पालिका क्षेत्र कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे.
पाईंटर
कोरोनाचे एकूण रुग्ण : ३०,१९७
बरे झालेले रुग्ण : २६,३९९
कोरोना बळी : ४६५
बॉक्स
शहरातील कोविड केअर सेंटर रुग्ण
सिटी मल्टिस्पेशालिटी सेंटर ४०
रिजनल सर्व्हिस हॉस्पिटल २२६
व्हीएमव्ही सेंटर ४५
वलगाव सेंटर ६५
सिटी मल्टिस्पेशालिटी ४०
बॉक्स
तालुका कोविड सेंटर रुग्ण
अचलपूर ०४ १११
अंजनगाव ०१ ३६
चांदूर बाजार ०१ १०
चांदूर रेल्वे ०१ १२
दर्यापूर ०१ ०२
नांदगाव खं. ०१ ३२
वरूड ०१ ०२
कोट
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, आम्ही १५ केंद्रे सुरू केली आहेत. त्यासोबतच चाचण्या वाढविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. याद्वारे अधिकाधिक संक्रमित निष्पन्न होऊन पुढे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी