पुसला : कोरोना विषाणू नियंत्रित आणण्याकरिता नागरिकांना शासनाने नियम बनवून दिले आहेत. परंतु, पुसला परिसरात या नियमांचे पालनच होत नाही. नागरिकांचा विनामास्क सर्रास मुक्त संचार वाढत आहे. पुसला परिसरातील बसस्थानक , बाजारपेठ , शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत असून, नियमांचे उल्लंघन सर्रास केले जात आहे. त्यामुळे ही ठिकाणी धोकादायक ठरू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
----------
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मनसेचे निवेदन
गुरुकुंज मोझरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिवसा तालुकाध्यक्ष तुषार वाढणकर यांच्या नेतृत्वात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नायब तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. जिल्हा सचिव रावसाहेब काजळकर, अतुल उमक, चंदेश मानकर, गब्बर पवार, अमोल लायबर, सुभाष चव्हाण, तुळशीदास डफड, गिरीधर राठोड, शुभम कांबळी, शंतनु कटनकर, वैभव मडकाम आदी यावेळी उपस्थित होते.