गोपाल डाहाके
पान २ तालुका आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर
फोटो पी १७ मोर्शी फोल्डर
मोर्शी : येथील उपजिल्हा रुग्णालयाची अस्वच्छतेशी गट्टी जमली आहे. दूरवर कुठेही नजर टाकली तर, अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे आजारी माणसे अधिक आजारी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाची संपूर्ण स्वच्छतेची गरज आहे. सोबतच रिक्त पदांचे ग्रहण लागल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठी भर पडली आहे.
येथे औषधनिर्माण अधिकाऱ्यांच्या ३ जागा मंजूर आहेत. त्यापैकी २ जण कार्यरत आहेत. परंतु, एक कर्मचारी २ वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जीला डेप्युटेशनवर असल्याने येथील एकाच औषधनिर्माण अधिकाऱ्यावर भार पडत आहे. यामुळे औषध वाटपामध्ये अनियमितता येत आहे. सहायक आरोग्य अधीक्षक मंजूर एक पद हेसुद्धा जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथे डेप्युटेशनवर असल्यामुळे हे पद रिक्त आहे.
या रुग्णालयात एकूण ४७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३६ पदे भरलेली असून, ११ पदे रिक्त आहेत. उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण दोन वार्ड आहेत. यामध्ये ५० बेडची व्यवस्था असून, दररोज १०० ते १२० रुग्ण ओपीडीमध्ये येतात. मात्र, सध्या या ठिकाणी भरती असलेल्या रुग्णांची संख्या फार कमी आहे, असे कनिष्ठ लिपिक मनीष अग्रवाल यांनी सांगितले.
तालुक्यामध्ये एकूण १०४ गावे असून, २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४५ हजार १५१ एवढी असून, तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पाच आहेत. यामध्ये अंबाडा नेरपिंगळाई, हिवरखेड, विचोरी, खेड या केंद्राशी संलग्नित असलेली उपकेंद्रे २१ आहेत. पैकी अंबाडाअंतर्गत अंबाडा (अ) खानापूर, पिंपरी, पिंपळखुटा मोठा, निंभी, हिवरखेड अंतर्गत हिवरखेड (अ व ब) पाळा खेडअंतर्गत रिद्धपूर (अ व ब) ब्राह्मणवाडा दिवे, तरोडा, उदखेड, नेरपिंगळाई अंतर्गत राजुरवाडी, शिरखेड, नेरपिंगळाई विचोरीअंतर्गत अडगाव, शिरजगाव, धामणगाव, रोहनखेड, दाभेरी अशी उपकेंद्रे आहेत.
आरोग्य विस्तार अधिकार्याची दोन्ही पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यक पुरुष मंजूर पदे ८. कार्यरत ७. अंबाडा रिक्त १. आरोग्य सहाय्यक महिला ७ पदे मंजूर असताना कार्यरत ७. आरोग्यसेवक पुरुष १. मंजूर ,१ कार्यरत, १ रिक्त, पाळा उपकेंद्रांमध्ये आरोग्यसेविका महिला मंजूर पदे २८ पैकी १ कार्यरत, १ पदे रिक्त, औषधनिर्माण अधिकारी मंजूर पदे ८. कार्यरत ४, सफाई कर्मचारी मंजूर पदे ५ पैकी कार्यरत ३, तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदावर ८ महिला आरोग्यसेविका असून, आरोग्य सहायक १ स्टाफ नर्स २, समुदाय आरोग्य अधिकारी १ अशाप्रकारे तालुका आरोग्य विभागात कर्मचारी संख्या आहे. परंतु, तालुका आरोग्य विभागाला स्वतःची जागा नाही. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सांभाळणारे कार्यालय मात्र २०० स्क्वेअर फुटात आहे, अशी माहिती कनिष्ठ सहायक सारंग नारिंगे यांनी दिली.
कोट १
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये पुरेसा औषधपुरवठा आहे. परंतु काही प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये पदे रिक्त आहेत.
- डॉ. महेश जैस्वाल,
तालुका आरोग्य अधिकारी, मोर्शी