अमरावती :अमरावतीमध्ये आज दुपारी दीडच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरींमुळे तपत्या उन्हाच्या उकाड्यापासून अमरावतीकरांनी थोडा दिलासा मिळाला. तर, अचानक पडलेल्याा पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळही उडाली.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे उन-पावसाचा खेळ सुरु आहे. आज सकाळी कडाक्याचं उन पडलं असतानाच अचानक दुपारी ढग दाटून आले व सोसाट्याचा वारा सुटला. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाड आणि विजांच्या कडकडाटांत पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, हवामान खात्याने किमान आठवडाभर म्हणजे १३ एप्रिलपर्यंत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तविली आहे. यातच आज दुपारी झालेल्या पावसाने वातावरणात उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली. तर, पुढचे दोन दिवस म्हणजे ७ व ८ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस व गारपिटीचीही शक्यता आहे.