अमरावती : पश्चिम विदर्भात दोन लाखांच्या कर्जमुक्तीसाठी विहित मुदतीत म्हणजेच १५ फेब्रुवारीपर्यंत ६ लाख ३७ हजार ६१२ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर 'अपलोड' करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. अद्यापही ५, हजार २३६ शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नसल्याने त्यांना योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे.
या योजनेत लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक हे महत्त्वाचे निकष असल्याने आधार संलग्न नसलेल्या खातेदारांची यादी तयार करण्यात येऊन प्रसिद्धी देण्यात आली. याविषयीची माहिती मिळताच खातेदारांनी बँक खाते आधार संलग्न केले. त्यामुळे विहित मुदतीत अधिकाधिक शेतकऱ्यांची माहिती बँका व सोासायटीद्वारा १ ते २८ कॉलममध्ये भरण्यात आली. त्यानंतर १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत ही नावे शासनाद्वारे जाहीर झालेल्या पोर्टलवर 'अपलोड' करण्यात आलेली आहेत.
या खातेदारांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या खात्याची थकबाकी असलेली रक्कम आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पाहणी करावी व मान्य असल्यास तशी नोंद करावी. त्यानंतरच त्यांचे खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. ज्या खातेदारांना रक्कम मान्य नसेल त्यांना जिल्हा समितीकडे ऑनलाइन तक्रार नोंदवावी लागणार आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. या समितीकडे तक्रारीची शहानिशा होणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली.
योजनेत पश्चिम विदर्भाची सद्यस्थिती (कोटीत) जिल्हा खातेदार थकबाकी विनाआधार अपलोडअमरावती १३९५७५ १२५०.१२ १५८२ १३१९६९अकोला ११३६५६ ७७५.८४ १०१५ १११०९३यवतमाळ १०८०४६ ७४५.६७ १२५९ १००३७९बुलडाणा १९८१७६ १४१२.३० ८११ १९३०९३वाशिम १०२७३८ ७३८.६९ ५७२ १०१०७८एकूण ६६२१८९ ४९२२.६३ ५२३९ ६३७६१२