-----------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------
नंबर लागण्यासाठी कसरत, वलगाव, बडनेरा, भातकुलीत तुफान गर्दी
(फोटो)
अमरावती : सुरुवातीला मंदगतीने होणाऱ्या लसीकरणासाठी आता कोणत्याही केंद्रावर तुफान गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी शहरालगतच्या केंद्रांवर धाव घेतल्याने तिथेही आता सकाळपासून रांगा लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत पाच टप्प्यांत लसीकरण सुरू झाले आहे. फेब्रुवारी महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढायला सुरुवात झाली व प्रत्येक कुटुंबाच्या संबंधित व्यक्ती संक्रमित झाल्यानंतर व जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची मृत्युसंख्या वाढायला लागल्याने परिस्थितीचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात आले. यामध्ये त्रिसूत्रीसोबतच कोरोना प्रतिबंधक लस घेणे तेवढेच महत्त्वाचे असल्याने आता केंद्रावर गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. लाभार्थींच्या तुलनेत केंद्रांची संख्या कमी व त्यातही मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी असल्यानेही लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे.
बॉक्स
केंद्रावर नागरिकांची बाहेर गाड्यांची गर्दी
शहरातील नागरिकांनी लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जवळच्या केंद्रांवर गर्दी केल्याने पहाटे ५ पासून रांगा लागत आहेत. याशिवाय या नागरिकांच्या वाहनांच्या केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून येत आहे. हीच स्थिती १८ ते ४४ वयोगटात दिसून येत आहे. एक तर या गटाच्या पहिल्या डोजसाठी केंद्रे कमी आहेत. याशिवाय ऑनलाईन नोंदणीत जिथे लस उपलब्ध असेल, त्या केंद्रावर जायची तयारी असल्याने ग्रामीणमधील केंद्रांवर रांगा लागत आहेत.