शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
5
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
6
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
7
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
8
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
9
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
10
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
11
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
12
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
13
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
14
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
15
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
16
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
17
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
18
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
19
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
20
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप

- तर कायदेशीर कारवाईसाठी पोलीस बळाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:18 PM

येथील संजय गांधीनगर क्रमांक २ हे वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित वस्ती आहे. राखीव वनजमिनीवर असलेली नागरी वस्ती हटविण्यासाठी गुरुवारी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देआरएफओंची माहिती : वरिष्ठांना पाठविणार वस्तुनिष्ठ अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: येथील संजय गांधीनगर क्रमांक २ हे वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित वस्ती आहे. राखीव वनजमिनीवर असलेली नागरी वस्ती हटविण्यासाठी गुरुवारी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसांत घरे हटविली नाही, तर पुन्हा दोन नोटीस बजावल्या जातील. त्यानंतरच कायदेशीर कारवाईसाठी पोलीस बळाचा वापर केला जाईल. वनविभागाने यासाठी तयारी चालविली आहे.सन १९८२ पासून वनजमिनीवर मौजा वनखंड क्रमांक जुना १८६ सर्व्हे नंबर ८४, ‘क’ वर्ग राखीव वनजमिनींवर अतिक्रमण करून घरे निर्माण केल्याचे वनविभागाने नोटीसद्वारे म्हटले आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ग, ई, फ, चा भंग केल्यामुळे संजय गांधीनगरात २७९ अतिक्रमितांविरुद्ध यापूर्वीच वनगुन्हे दाखल झाले आहेत. सात दिवसांत घरे हटविण्यात यावीत, अन्यथा शासकीय बळाचा वापर करून नियमानुसार अतिक्रमण हटविली जातील, असे नोटीसमध्ये नमूद आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१ए) (बी) प्राप्त अधिकारान्वये सरकारजमा करण्याची कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा ‘अल्टिमेटम’ अतिक्रमिकांना दिला आहे. सात दिवसांत नोटीसला प्रतिसाद मिळाला नाही, तर पुन्हा तीन दिवसांच्या अवधीची नोटीस बजावण्यात येतील. त्यानंतर अंतिम इशारा म्हणून तिसरी नोटीस बजावून एक दिवसाची मुदत दिली जाईल. हा सर्व प्रशासकीय सोपस्कार आटोपताच पोलीस बळाचा वापर करून घरे उद्ध्वस्त केली जातील, अशी तयारी वनविभागाने चालविली असल्याचे वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.विधिमंडळ लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार वनजमिनीं-वरील अतिक्रमण हटविले जात आहे. कारवाई रोखण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला नाहीत. परंतु अतिक्रमणसंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल वनविभागाकडून मागविला असून तो शासनाकडे पाठविला जाईल.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी, अमरावती.संजय गांधीनगर हे राखीव वनजमिनीवर अतिक्रमित नागरी वस्ती आहे. २७९ घरे हे वनजमिनीवर असल्याबाबतची वनविभागाकडे नोंद आहे. त्यानुसार अतिक्रमित धारकांना नोटीसा बजावल्या आहेत. राखीव वनजमीन खाली केली नाही, तर कायदेशीर कारवाई केली जाईल.- हेमंत मिणाउपवनसंरक्षक, अमरावती