परतवाडा :
मध्यम प्रकल्प विभाग अमरावती यांच्या अखत्यारित सुरू असलेल्या अचलपूर तालुक्यातील बोरगाव दोरी पुनर्वसन नागरी सुविधा कामात अवैधरित्या चोरलेल्या रेतीचा वापर होत असल्याची तक्रार मनसेच्यावतीने अचलपूर तहसीलदारांकडे गुरुवारी करण्यात आली. संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
अचलपूर तालुक्यातील बोरगाव दोरी गावाचे पुनर्वसन मध्यम प्रकल्प विभाग अमरावती यांच्यामार्फत सुरू आहे. पुनर्वसन नागरी सुविधा हे काम अंजनगाव येथील श्रीराम कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे कंत्राटी पद्धतीने केले जात आहे. या कामाला सुरुवात केली तेव्हापासून कामावर सापन नदीपात्रातील रेतीचा अवैध उत्खनन करून वापर करण्यात येत आहे तशी तक्रार मनसेच्यावतीने अचलपूर तहसीलदार यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्ष राज पाटील, राहुल अतकरे, रुपेश शर्मा, अक्षय काजे, दिलीप गुरलेकर, चेतन चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी केली.
नियमबाह्यरित्या नदीपात्रात उत्खनन करण्यात आले व रेतीची वाहतूक गाढवावरून करण्यात आली. या पुनर्वसन कामावर वापरण्यात आलेली रेती अंदाजपत्रकात नमूद नोंदी, प्रत्यक्ष वापरण्यात आलेली रेती याची नोंद मोजमाप पुस्तिकांमध्ये नमूद केल्याप्रमाणे तपासून संबंधित एजन्सीविरुद्ध चोरीचा गुन्हा व दहापट दंड आकारण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
कोट
बोरगाव दोरी पुनर्वसनाच्या कामात रेती संदर्भात तक्रार प्राप्त झाली. तलाठी व मंडळ अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले.
शंकर श्रीराव,
नायब तहसीलदार
अचलपूर
===Photopath===
270521\1734-img-20210527-wa0067.jpg
===Caption===
पुनर्वसन बोरगाव दोरी येथील कामात रेतीची चोरी वापरत असल्याची तक्रार देताना मनसे कार्यकर्ते