चेतन घोगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अमरावती जिल्ह्यात वाहने पुरवण्याबाबत ई-निविदा सन २०१६-१७ मध्ये काढण्यात आली. हीच ई-निविदा सन २०१८ साठी लागू करण्यात आली. मात्र, त्यातील बहुतांश वाहने निकामी व परवाना संपलेली आढळून येत आहेत. त्यामुळे ई-निविदाव्यतिरिक्त वाहनांचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात शालेय आरोग्य तपासणी पथक १, २ व ३ साठी एकूण ३४ वाहनांची ई-निविदा सन २०१७ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मागविण्यात आली होती. परंतु, ही निविदा एक वर्षात तीन वेळा बदलण्यात आली. पहिली निविदा ३ जानेवारी २०१७, दुसरी २७ जानेवारी २०१७, तिसरी ११ आॅगस्ट २०१७ रोजी काढण्यात आली. या निविदेत एकूण ३४ वाहने पुरविण्याचा करार रत्नम टूर्स अँड ट्रान्सपोर्टचे मालक समीउद्दीन वाहोउद्दीन सैयद (रा. कॉटन मार्केट, परतवाडा) यांना देण्यात आला होता. पत्र क्र. ३५४ दि. १२-१-२०१७ व पत्र क्र. १९ जानेवारी २०१७ नुसार रत्नम टूर्स अँड ट्रान्सपोर्ट यांना सुधारित वाहनांचे वेगवेगळे आदेश कार्यालयाकडून देण्यात आले. २०१७ चा ई-निविदा आदेश ३४ वाहनांचा असतानाही पुन्हा त्यालाच सुधारित आदेश का देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ई-निविदाधारक वाहन पुरवण्यास अपात्र असल्याचे दिसून येत असले तरी ई-निविदा रद्द करण्यात आली नाही.चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयाकरिता ३ जानेवारी ते ३० आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांच्या कार्यकाळात केने नामक व्यक्तीचे वाहन वापरण्यात असल्याचे दिसून येत आहे. भातकुली तालुक्यातसुद्धा असाच प्रकार उघडकीस आला आहे. तिवसा, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, भातकुली, उपजिल्हा रुग्णालयात खासगी वाहनांचा वापर होत असल्याच्या उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी व ई-निविदाधारक यांच्यात ‘मधुर’ संबंधातून आर्थिक व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे. ई-निविदेतील ३४ पैकी काही वाहनांचा रोड टॅक्स, इंश्युरन्स व इतर महत्त्वाच्या बाबी आरटीओ कार्यालयात जमा नाहीत, हे उल्लेखनीय.काही वाहनांची खोटी कागदपत्रे?राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात वापरण्यात आलेले ३४ वाहनांपैकी काही वाहनांची खोटी कागदपत्रे अमरावती येथील आरटीओ एजंटमार्फत बनविल्याची खात्रीशीर माहिती आहे. ते या ई-निविदामध्ये वापरण्यात आले आहे.महिन्याला वाहनामागे एक हजार रुपयेई-निविदाधारकाला ज्यांनी आपले वाहन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमात चालवण्यास दिले, त्यांना वाहनचालकाकडून दरमहा एक हजार रुपये रोख प्राप्त होत असल्याचे एका वाहनमालकाने नाव अप्रकाशित ठेवण्याच्या अटीवर सांगितले.ई-निविदामध्ये दिलेल्या वाहनाव्यतिरिक्त जर दुसरे वाहन वापरण्यात येत असेल, तर चौकशी करून ई-निविदा ज्यांनी घेतली असेल, त्याच्यावर कारवाई करू.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक अमरावती
बाल स्वास्थ्य योजनेत ई-निविदा व्यतिरिक्त वाहनांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 9:37 PM