अमरावती प्रतिनिधी,
महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रातील ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटाकरिता ज्या नागरिकांचा कोविड-१९ अंतर्गत कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोज घ्यावयाचा राहीलेला आहे अशा नागरिकांना कोविशिल्ड या लसीचा डोस उपलब्ध आहे. पहिल्या डोसकरिता ५० कुपन तर दुसऱ्या डोसकरीता १५० कूपन शुक्रवारी सकाळी ७ वाजता वाटण्यात येणार आहे. या लसीकरण केद्रांवरुन फक्त कोविशिल्ड लसीचा डोज सकाळी ९ ते ५ या वेळेत देण्यात येणार आहे.
मनपा दवाखाना मोदी हॉस्पिटल बडनेरा, मनपा दवाखाना भाजीबाजार, यंग मुस्लिम सो.असो. नागपुरी गेट, मनपा दवाखाना मसानगंज, शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी, दंत महाविद्यालय, श्री. तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथिक कॉलेज व रुग्णालय शहरी आरोग्य केंद्र दस्तुरनगर, डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय, आयसोलेशन दवाखाना, शहरी आरोग्य केंद्र विलास नगर, मनपा दवाखाना बिछुटेकडी, मनपा दवाखाना सबनिस प्लॉट, वसंत हॉल, तसेच नर्सिंग होस्टेलच्या दोन केंद्रावर कोविशिल्ड ही लस उपलब्ध राहणार आहे.