चांदूर रेल्वे : गावनिहाय लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्राची मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे पत्राद्वारे केली होती. त्याला प्रतिसाद देत, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार तालुक्यात लसीकरण होत आहे.
तालुक्यातील सावंगा विठोबा, मांजरखेड, चिरोडी या गावांमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात सावंगा विठोबा येथे १०३, चिरोडी येथे ८३, मांजरखेड येथे १८३ अशा ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य अमोल होले, सावंगाचे सरपंच बंडू भोजने, उपसरपंच काशीनाथ मेश्राम, सदस्य काजल चतुर, रोशनी कुकडकर, संजय मेंढे, इंदूबाई नांदूरकर, कविता लालखेडे, करण चतुर आदी उपस्थतीत होते. डॉ. हुतके यांच्या मार्गदर्शनात लसीकरणासाठी पटवारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
===Photopath===
310521\img-20210531-wa0017.jpg
===Caption===
photo