धामणगाव रेल्वे : तालुक्यातील मलातपूर येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने तब्बल २०० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील सर्व जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर लसीकरण पार पडले.
धामणगाव रेल्वे तालुक्यात कोरोना रुग्ण जरी कामे होत असली तरी आरोग्य विभागाने प्रत्येक गावात कोरोना चाचणी घेण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे. मलातपूर येथे काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे येथे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी सरपंच अर्चना उईके, उपसरपंच मनोज ढोबळे, ग्रामसेवक विलास बिरे, ग्रामपंचायत सदस्य समीर खेडकर, आरोग्य सेवक संतोष वायचोळे, मनोज सरदार, संदीप चुलबुलकर, उज्ज्वल गुल्हाने, मनीषा निंभोरकर, सूरज रघे, विनय भुरे ,सविता कोल्हे, नेहा मेंढे, उमेश आळे, माया गायकवाड, सविता गजभिये, अमोल कांबळे, गौरव गजभिये, भारती राऊत यांची उपस्थिती होती.