फोटो पी ०३ जळगाव
धामणगाव रेल्वे : तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या जळगाव आर्वी येथे ४५ वर्षांवरील तब्बल दीडशे जणांना एका दिवशी कोरोना लस देण्यात आली.
गावातील प्रौढ व्यक्तींना लस मिळावी, यासाठी माजी सरपंच धीरज मुडे यांच्या पुढाकाराने शनिवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर घेण्यात आले. सर्वप्रथम माजी सरपंच धीरज मुडे, सरपंच सत्यभामा कांबळे यांनी ही लस घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली. तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी स्वतः हजेरी लावली. प्रत्येक ग्रामस्थांनी आपले ऑनलाईन नाव नोंदविले होते. यावेळी पोलीस पाटील किशोर भोगे, ग्रा पं. सदस्य अतुल भोगे, अविनाश देशमुख, माजी उपसरपंच संदीप भोगे, राजीव भोगे, अनुराग मुडे, पंडित कांबळे, अशोक क्षीरसागर, साहेबराव भोसले, आरोग्य विभागातील डॉ. सचिन देवकर, डॉ. उज्ज्वल गुल्हाने, आरोग्य कर्मचारी बी. एम. सरदार, संदीप चूलमूलकर, गजानन क्षीरसागर, पुष्पा वाढवे, सारिका गोमासे, राजेंद्र व्यवहारे विजया टोणपे, कविता क्षीरसागर, प्रज्ञा भोसले, रुपेश उडाखे यांची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन- माजी सरपंच धीरज मुडे लस घेताना