ग्रामपंचायतीचा पुढाकार, सरपंचांसह लोकसहभागातून आरोग्यलाभ
अंजनगाव सुर्जी : कोविड-१९ लसीकरणाबाबत पुढाकार घेऊन सरपंच शशिकांत मंगळे यांनी कसबेगव्हाण येथील ज्येष्ठ नागरिकांना कोकर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले. त्यांच्याकरिता लोकसहभागातून ये-जा करण्यासाठी वाहने उपलब्ध करण्यात आली होती.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सध्या ज्येष्ठांना लस देण्यात येत आहे. त्यामुळे गावातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन शशिकांत मंगळे यांनी केले होते. त्यानुसार ११० ज्येष्ठांनी नोंदणी करण्यात आली. त्यांना कोकर्डा येथे ने-आण करण्यासाठी गजानन डाहे, बबलू डोंगरे, शाहरुख आणि सलीम यांनी व्हॅन उपलब्ध केल्या.
आशा पर्यवेक्षक चौधरी, आशा सेविका लीला डिके, सीमा दामले, मंदा बाभूळकर, सुनीता गोमासे, अंगणवाडी सेविका मंदा बुजाडे, सायबबी मोहम्मद युसूफ, पुष्पा जावरकर, संगीता नेमाडे, संघमित्रा गायकवाड यांच्यासह सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी मनोहरराव टेकाडे यांनी सहकार्य केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन खोरगडे, डॉ. शुभम भरणे, हिंगे यांनी वैद्यकीय सेवा दिली.