११ जूनसाठी ऑनलाईन नोंदणी सकाळी ७ वाजता, तर टोकन ८.३० वाजता सुरू होणार आहे. यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, मनपा दवाखाना मसानगंज, शहरी आरोग्य केंद्र, महेंद्र कॉलनी, शहरी आरोग्य केंद्र, विलास नगर, शहरी आरोग्य केंद्र, भाजीबाजार, मनपा दवाखाना बिच्छुटेकडी, यंग मुस्लिम सो. असो. नागपुरी गेट, तखतमल महाविद्यालय, दंत महाविद्यालय, मनपा दवाखाना सबनीस प्लॉट, मोदी हॉस्पिटल बडनेरा, आयसोलेशन दवाखाना, एम.आय.डी.सी. सातुर्णा व एम.आय.डी.सी. दस्तुरनगर तसेच दंत महाविद्यालय येथे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय याच वयोगटात को-व्हॅक्सिनचा दुसरा डोस ५० टक्के ऑनलाईन पद्धतीने, तर ५० टक्के टोकन पद्धतीने आयसोलेशन दवाखाना व शहरी आरोग्य केंद्र, दस्तुरनगर येथे उपलब्ध आहे. आयसोलेशन दवाखाना, केद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी आणि ७० वर्षावरील व्यक्तींसाठी ५० डोस राखीव ठेवण्यात आले आहेत.
शहरात १७ केंद्रावर आज लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:10 AM