संजय खासबागे ।लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : बोर अभयारण्यातून भरकटलेल्या नरभक्षी वाघिणीचे बुधवारी तिसºया दिवशी ७२ तासांनंतर बेशुद्धिकरण करता आले नाही. मात्र, ती वरुड नजीकच्या घोराड शेतशिवारात दडून बसलेली असताना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अचानक तिने हुलकावणी देत जवळील कपाशीच्या शेतात ‘डेरा’ मांडला. दरम्यान अंधार पडल्याने तिला जेरबंद करता आले नाही, हे विशेष.वरुडपासून नागपूर मार्गावर आठ किमी अंतरावर असलेल्या घोराड शेतशिवारात रेस्क्यू आॅपरेशनच्या दोन हत्ती, दोन वाहने अशा वेगवेगळ्या चार चमुने बुधवारी सकाळी ६ वाजतापासूनच वाघिणीचा शोध घेण्यासाठी तयारीे चालविली होती. कॉलर आयडीद्वारे रेस्क्यू पथकाला लोकेशनसुद्धा मिळाले होते. त्यानुसार वनविभागाने जेसीबीद्वारे झुडुपे हटविण्याचा निर्णय घेतला. तिचे सुखरुपतेने बेशुद्धिकरण होणार, अशी संपूर्ण तयारी वनविभागाने केली. मात्र बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या वाघिणीने कपाशीच्या शेतात डेरा मांडला. अशातच अंधार झाल्यामुळे रेस्क्यू आॅपरेशन थांबविले. आता गुरुवारी ५ आॅक्टोबर रोजी वाघिणीचा शोध घेऊन तिला बेशुद्ध केले जाईल, असे वनाधिकाºयांनी स्पष्ट केले.अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक पंचभाई, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, राजेंद्र बोंडे आदी वनाधिकाºयांनी वरुड परिसरातील जंगलात ठिय्या मांडल्याचे दिसून आले.नरभक्षी वाघिणीला नेण्यासाठी आले स्वतंत्र वाहनवरूड : तीन दिवसांपासून शेतकरी, शेतमजूर कामावर जाऊ शकले नाही. यामुळे शेतीकामावर परिणाम झाला आहे. वनविभागाने पिसाळलेल्या वाघिणीचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हीच काहीतरी करु, असा इशारा गावकºयांनी दिला आहे. उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार घोराड शिवारात दडून बसलेली वाघीण रात्री उशिरा सावंगी शेतशिवारात असल्याचे वनविभागाने सांगितले. दरम्यान ती पंढरी एकलावीर जंगल मार्गाने मध्यप्रदेशच्या दिशेने कूच करू शकते, अशी शक्यता असून त्यानुसार मध्यप्रदेश वनविभागाला अवगत करण्यात आले आहे.हैद्राबाद येथून आणला 'शार्प शूटर'पिसाळलेल्या नरभक्षी वाघिणीचे बेशुद्धीकरण करण्यासाठी वनविभागाने हैद्राबाद येथील शेख नवाब अली खान नामक 'शार्प शुटर'ला पाचारण केले आहे. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी स्वतंत्र दोन हत्ती आणि वाहने असलेली चमू आहे. या चमुकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असून नरभक्षी, पिसाळलेल्या वन्यपशूंना जेरबंद करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
‘त्या’ वाघिणीचा कपाशीच्या शेतात डेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 11:55 PM
बोर अभयारण्यातून भरकटलेल्या नरभक्षी वाघिणीचे बुधवारी तिसºया दिवशी ७२ तासांनंतर बेशुद्धिकरण करता आले नाही.
ठळक मुद्देकॉलर आयडीने लोकेशन : जेसीबीने काढली झुडुपे