लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधी, फार्मसी व अभियांत्रिकीचे रखडलेले निकाल व एमबीए निकालात तृटीच्या कारणावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संत गाडगेबाबा विद्यापीठात सायकल आंदोलन केले. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक वाद झाला.अभाविपचे विदर्भ प्रांत सहमंत्री ज्ञानेश्वर खुपसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तासभर कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचेशी अभाविपने विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी परीक्षा व मूल्यांकन विभागाचे हेमंत देशमुख, डी.टी. इंगोले, दिनेश सातंगे आदी उपस्थित होते. यावेळी यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयातील एमबीए प्रथम वर्षांच्या ५० विद्यार्थ्यांपैकी ४९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले कसे? ही बाब अभाविपने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. पेपरचे मूल्यांकन सुरळीत होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे एमबीए अभ्यासक्रमाचे पुनर्मूल्यांकनाची मागणी करण्यात आली. आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ दरम्यान झालेल्या परीक्षांचे निकाल त्वरित जाहीर करावे. विधी, अभियांत्रिकी आणि फार्मसी परीक्षांचे निकाल लावून विद्यार्थ्यांना न्याय प्रदान करावा. पुनर्मूल्यांकनात विद्यार्थी उत्तीर्ण झाला असेल तर त्याचे शुल्क परत करावे. विद्यापीठात सायकल स्टॅन्डवर शुल्क आकारू नये, वाचनालयात स्वत:चे पुस्तक नेण्याची परवानगी मिळावी, परीक्षा पद्धत व निकालातील घोळ सुधारावा आदी मागण्यांबाबत कुलगुरूंशी चर्चा केली. यावेळी दुर्गेश साठवणे, सौरभ लांडगे, श्रीराम उगले, शिवशंकर लाऊळकर, अजय इखार, रितेश बावनकर, अनिकेत इंगोले, शिवानी मोरे, दीक्षा बनसोड, सुमित राऊत, विलास शर्मा प्रज्ज्वल शेवतकर आदी अभाविपचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठ आहे. काही तांत्रिक कारणांमुळे निकालास विलंब होत असला तरी निकाल अचूक लावणे ही मोठी जबाबदारी आहे. येत्या १० दिवसांत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. एमबीए विषयाचे प्राप्त अर्जानुसार पुनर्मूल्यांकन होईल.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संगाबाअ, विद्यापीठ
कुलगुंरूसोबत अभाविपची शाब्दिक वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 9:51 PM
विधी, फार्मसी व अभियांत्रिकीचे रखडलेले निकाल व एमबीए निकालात तृटीच्या कारणावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संत गाडगेबाबा विद्यापीठात सायकल आंदोलन केले. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक वाद झाला.
ठळक मुद्देविद्यापीठात सायकल आंदोलन : विधी, फार्मसी, अभियांत्रिकी निकालावरून संतप्त