लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शेवटचे दर्शन व्हावे, यासाठी अमरावती जिल्ह्यात २३ आॅगस्ट रोजी अस्थिकलश आणण्यात आला. त्या अस्थीचे जिल्ह्यातील नागरिकांनी दर्शन घेऊन रविवारी सकाळी १० वाजता विसर्जन तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथे करण्यात आले.हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूजाअर्चा पिंडदान भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी केले. त्यानंतर पालकमंत्री प्रवीण पोटे, ज्येष्ठ भाजप नेते अरुण अडसड, शिवराय कुळकर्णी यांनी वर्धा नदीत अस्थी विसर्जित केल्या.यावेळी कार्यकर्त्यांनी परिसर गजबजून गेला होता. अस्थी विसर्जनासाठी अमरावती तिवसा, कुºहा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील बरेच कार्यकर्ते आले होते. यावेळी धामणगाव नगराध्यक्ष प्रताब अडसड, विवेक बिंड, सुरेश मुंधडा, विजय डहाके, राजू टेकाळे, नितीन धांडे, राजू लोहे, नवनीत दारोकर आदी तालुका, जिल्हातील सर्वच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने होते.
कौंडण्यपुरात वाजपेयींच्या अस्थी विसर्जित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:57 PM
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शेवटचे दर्शन व्हावे, यासाठी अमरावती जिल्ह्यात २३ आॅगस्ट रोजी अस्थिकलश आणण्यात आला. त्या अस्थीचे जिल्ह्यातील नागरिकांनी दर्शन घेऊन रविवारी सकाळी १० वाजता विसर्जन तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथे करण्यात आले.
ठळक मुद्देनागरिकांची प्रचंड गर्दी : पालकमंत्र्यांची उपस्थिती