शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

बेभान कार चालकाने चार दुचाकींना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 10:12 PM

शहरात बेभान वाहतुकीने कळस गाठला असून, शुक्रवारी रात्री भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. ही घटना नवाथे चौकात घडली. गेल्या दोन दिवसांत शहरात दोन ठिकाणी अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या.

ठळक मुद्देदोन दिवसात दुसरी घटना : अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे वाढले अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात बेभान वाहतुकीने कळस गाठला असून, शुक्रवारी रात्री भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. ही घटना नवाथे चौकात घडली. गेल्या दोन दिवसांत शहरात दोन ठिकाणी अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या.या अपघातातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवाथे चौकात घडलेल्या अपघातात रोशन अळसपुरे (३०,रा.शशिनगर) व निकिता राजकुमार सहारे (२३) हे दोघेच राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचले, तर अन्य जखमी पोलिसांपर्यंत पोहोचले नाहीत. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी चालक योगेश ज्ञानेश्वर जवंजाळ (रा.रविनगर) याला ताब्यात घेतले. शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्तीत वाहने चालवित असल्यामुळे अपघात वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी फे्रजरपुरा हद्दीतील वडाळी मार्गावर भरधाव ट्रकने चार दुचाकींना एका पाठोपाठ धडक दिली. या अपघातातही पाच जण जखमी झालेत. ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. शुक्रवारी रात्री भरधाव कार क्रमांक एमएच ०३ एडब्ल्यू ०४३२ नवाथे रेल्वे पुलाकडून बडनेराकडे जाण्यासाठी वळत होती. दरम्यान बडनेरा रोडच्या कडेला उभ्या दुचाकींना कारने धडक देत समोर जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक दुचाकी व कार खाली आली होती. सुदैवाने प्राणहानी टळली. या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहने थांबली होती. नागरिक व जखमींनी कारचालकाला चोप दिला. त्याने पसार होऊन राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कार ताब्यात घेतली. वाहतूक सुरळीत केली. दोन दिवसांत ही दुसरी घटना शहरात घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांविरुद्ध द्वेषभावना भडकाविणाऱ्याविरुद्ध गुन्हावडाळी मार्गावर झालेल्या अपघातातील दुचाकी घटनासथळीच पडून होत्या. दरम्यान एका इसमाने जमिनीवर पडलेल्या दुचाकी पोलिसांना उचलू न देता जमावाला भडकविण्याचे प्रयत्न केला. लोकांमध्ये पोलिसांविरुद्ध द्वेषभावना भडकावित, शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात पोलिसांनी संजयसिंह कुवरसिंह ठाकूर (४७,रा.व्यकटेंश कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.