शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिनींचे महालेखाकारांकडून परीक्षण, गैरव्यवहाराची चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 6:34 PM

राज्यात महसूल विभागाने १४ एप्रिल १९७६ पासून विविध कामांच्या नावे ताब्यात घेतलेल्या वनजमिनी परत केल्या नाहीत तसेच आतापर्यंत एकाही वरिष्ठ वनाधिकाºयाने त्या परत घेण्याचे धाडस दाखविले नाही. आता या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार असून, गैरव्यवहार असल्यास त्याची चौकशी होईल, असे पत्र ‘कॅग’ने जारी केले आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : राज्यात महसूल विभागाने १४ एप्रिल १९७६ पासून विविध कामांच्या नावे ताब्यात घेतलेल्या वनजमिनी परत केल्या नाहीत तसेच आतापर्यंत एकाही वरिष्ठ वनाधिकाºयाने त्या परत घेण्याचे धाडस दाखविले नाही. आता या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार असून, गैरव्यवहार असल्यास त्याची चौकशी होईल, असे पत्र ‘कॅग’ने जारी केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच वनजमिनींबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. गत ३७ वर्षांपासून ‘महसूल’च्या ताब्यात असलेली आठ लाख हेक्टर वनजमीन परत करण्यासाठी राज्याच्या वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी २ डिसेंबर २०१६ रोजी आदेश जारी केले होते. मात्र, या आदेशाला ‘महसूल’ने जुमानले नाही. वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी शासनस्तरावर बैठकांचे सत्र चालते. त्यानंतर ‘जैसे थे’ होते, हा शिरस्ता आहे. दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने आढावा घेताना ‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिनी परत घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्यात. मात्र, ‘महसूल’सोबत कोण वैर घेईल; त्यापेक्षा ‘टाइमपास’ करण्यातच यापूर्वीच्या तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी भूमिका घेतली आहे. वनविभागाला घरचा आहेरमहसूल विभागाकडे असलेल्या वनजमिनींचा ‘प्रसाद’ कुणाला मिळाला, यासंदर्भात १ जानेवारी २००० पासून उच्चस्तरीय चौकशी केल्यास डझनाहून जास्त तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक आरोपींच्या पिंजºयात उभे राहतील, असा दावा सेवानिवृत्त उपवनसंरक्षक हेमंत छाजेड यांनीच मुंबई येथील प्रधान महालेखाकारांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीचा हवाला देत ‘कॅग’ने १२ जानेवारी रोजी राज्य शासनाला पत्र पाठविताना ‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिनींचे परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. 

२० लाख हेक्टर वनजमिनीचे झाले नुकसान वनजमिनींचे वाटप करताना वरिष्ठ वनाधिका-यांनी नियमावली गुंडाळली. यामध्ये २० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. यात रत्नागिरी/रायगड जिल्ह्यात ८०१९३, सिंधुदुर्ग - ३८५२१, मुंबई उपनगर - २४२६, नाशिक - २०९६१, ठाणे - ५०७३८, धुळे/नंदुरबार - ७५३९०, जळगाव - ७, अहमदनगर - ४३२८६, पुणे - ४६४२२, सातारा - ८३०७, कोल्हापूर - १७१९४, सोलापूर - १९१३९, सांगली - १३७६७, बुलडाणा - ४३३२३, अकोला - ६९७७, यवतमाळ/वाशिम - ७६७१६, अमरावती - ११७२०, नागपूर - ५१७७८, भंडारा/गोंदिया - ५६२९०, चंद्रपूर/गडचिरोली - ५६२९०, नांदेड - ११२०, बीड - १०९९९, लातूर - ३३७८, उस्मानाबाद जिल्ह्यात ७०८१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती