अमरावती : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-१ मध्ये हगणदरीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ मध्ये शौचालयाचा वापर कायम ठेवून व्यापक प्रमाणावर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आधारे खेड्यांना हगणदरीमुक्तीच्या मार्गावर नेणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीकरिता विविध स्पर्धांचे आयोजन मिशनच्यावतीने करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभाग जलशक्ती मंत्रालयाच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता लघुपटांचाही अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पेयजल व स्वच्छता विभाग स्वच्छ भारत मिशनचा टप्पा-१ मध्ये हगणदरीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा-२ मध्ये शौचालयाचा वापर कायम ठेवून व्यापक प्रमाणात गणपतराव सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे खेड्यांमध्ये हगणदरीमुक्त करण्यासाठी शासनाने लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे.